Tarun Bharat

पुतीन यांच्या विरोधात रशियामध्ये निदर्शने

Advertisements

38 शहरांमध्ये लोक उतरले रस्त्यांवर : 1300 हून अधिक जण ताब्यात

वृत्तसंस्था /मॉस्को

रशिया-युक्रेन युद्ध मागील 7 महिन्यांपासून सुरू आहे. याचदरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी 21 सप्टेंबर रोजी युक्रेनच्या 4 भागांमध्ये 3 लाख राखीव सैनिक तैनात करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर रशियात निदर्शने सुरू झाली आहेत. या निदर्शनांना रोखण्यासाठी पोलिसांनी हजारो लोकांना ताब्यात घेतले आहे.

येकोतेरिनबर्ग समवेत काही शहरांमध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये झटापट झाली आहे. निदर्शने तीव्र झाल्याने पोलिसांनी लोकांवर लाठीमार सुरू केला होता. पोलिसांनी निदर्शने करणाऱया महिलांना निर्दयपणे मारहाण केल्याचे काही व्हिडिओंमध्ये दिसून आले आहे. तर हजारोंच्या संख्येत रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी ‘युद्ध नको’ अशा घोषणा दिल्या आहेत. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग समवेत 38 शहरांमध्ये निदर्शने करत असलेल्या 1,371 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुतीन यांच्या 3 लाख राखीव सैनिकांना तैनात करण्याच्या निर्णयामुळे युक्रेन युद्ध आणखी चिघळू शकते.

पुतीन यांनी लादलेल्या युद्धामुळे प्रत्येक जण घाबरून गेला आहे. आम्ही शांतता इच्छितो, रायफल पकडून लोकांना गोळी घालण्याची आमची इच्छा नसल्याचे निदर्शनात सामील वासिली फेडोरोव्हने म्हटले आहे. युद्धविरोधी आंदोलन वेस्ना यूथ डेमोक्रेटिक मूव्हमेंटने लोकांना निदर्शने करण्याचे आवाहन केले होते. रशियाच्या सैन्याच्या विशेष मोहिमेत भाग न घेण्याचा आणि लवकरात लवकर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन रशियाच्या सैनिकांना करत आहोत. या सैनिकांनी पुतीन यांच्यासाठी मृत्युमुखी पडण्याची गरज नसल्याचे वेस्नाने म्हटले आहे.

Related Stories

”युद्ध सुरू झाल्यापासून आम्हांला मदत मिळालेली नाही”

Sumit Tambekar

रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना कोरोनाची बाधा

datta jadhav

भविष्यात प्रिंट होऊन येणार अनोख्या गोल इमारती

Patil_p

काबुल विमानतळावर हल्ल्याची शक्यता

datta jadhav

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत किम कार्दशियन

Patil_p

युक्रेनपेक्षा रशियाची अधिक जीवितहानी

Patil_p
error: Content is protected !!