Tarun Bharat

त्या आमदारांनी राजीनामा देऊन पक्षांतर करावे पक्षांतर विरोधी समाजसेवकांची वास्कोत निदर्शने

प्रतिनिधी / वास्को

ज्या आमदारांना आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करावा असे वाटते त्या आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊनच इतर पक्षात प्रवेश करावा. जनतेचा विश्वासघात घात करू नये. हिंमत असेल तर राजीनामा देण्याचे धैर्य दाखवावे असे आवाहन गोव्यातील विविध बिगरसरकारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

गोव्यात काँग्रेसचे काही आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असल्याने गेल्या काही दिवसांपासून बिगर सरकारी संघटनांच्या प्रतिनिधींनी गोव्यातील विविध शहरात पक्षांतराविरूध्द जनजागृती करण्यासाठी तसेच पक्षांतराच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहेत. गुरूवारी संध्याकाळी वास्कोतील मुरगाव पालिका इमारतीसमोर अशी निदर्शने करण्यात आली. यावेळी मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो, तारा केरकर, जयेश शेटगावकर, शंकर पोळजी, महेश नाईक व इतर समाजसेवकांनी जे आमदार पक्षांतर करू पाहात आहेत अशा आमदारांनी प्रथम आमदारकीचा राजीनामा द्याव आणि नंतरच इतर पक्षात प्रवेश करून निवडून येऊन दाखवावे असे आवाहन केले. जनतेने अमुक एका पक्षाचे म्हणून त्यांना निवडून दिलेले आहे. अशा आमदारांनी इतर पक्षात प्रवेश करणे जनतेचा विश्वासघात आहे. विरोधी आमदारांना विरोधक म्हणून आपली भुमीका बजावता येत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. काही आमदार निवडणुकीसाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी पक्षांतर करू पाहतात अशी चर्चा आहे. मात्र, निवडणुकीसाठी मोठमोठी कर्जे का काढावी लागतात असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

यापूर्वी पक्षांतर केलेल्या आमदारांना जनतेने धडा शिकवलेला आहे. पुन्हा पक्षांतर झाल्यास जनता तेच करणार आहे. मात्र, त्यापूर्वी गोव्यातील जनतेच्या रोषाला या आमादारांना सामोरे जावे लागेल. सबंध गोव्यात पक्षांतराविरूध्द जनजागृती करण्यात येईल असे स्पष्ट करून उपस्थित वक्त्यांनी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सरकारवरही कडक शब्दात टीका केली.

Related Stories

विनयभंगप्रकरणी संशयिताला अटक

Amit Kulkarni

वेर्णा महालसा नारायणी देवस्थानचा उद्यापासून जत्रोत्सव

Amit Kulkarni

परीक्षा रद्दच करा, अन्यथा शाळेतच त्वरित घ्या

Omkar B

‘कोविड’च्या संकटात ‘दिल की आवाज सून’…

Patil_p

दिव्यांग ‘संतोष’चा चाललाय जगण्यासाठी संघर्ष…

Amit Kulkarni

लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वाळपई शहरातील 90 टक्के आस्थापने सुरू

Omkar B