पावसाळा आला की साथीचे रोग सुरु होतात. सर्दी, ताप,खोकला यासारखे प्राथमिक आजार होतातचं. याचबरोबर काही गंभीर आजार देखील होतात. सध्या डेंग्यूचा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. वेळीच यावर औषधपचार नाही केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. यामध्ये अलीकडेच एका तरुणाला आपला जीव गमवावा आहे. त्यामुळे डेंग्यूची लक्षणे आणि त्यावरील उपायाची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेची आहे. म्हणूनच आज आपण डेंग्यू म्हणजे काय?, प्रसार कसा होतो, लक्षणे काय आहेत आणि उपचार कसे करावेत याविषयी जाणून घेणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization – WHO) डेंग्यूबद्दलची काही महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. याविषयी जाणून घेऊया.
डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने इडिस एजिप्ती (Aedes aegypti) या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस (Aedes albopictus) या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. 1970 पूर्वी केवळ 9 देशांत डेंग्यूच्या गंभीर साथी आल्या होत्या. आता तो 100 हून अधिक देशांत आढळतो. जगातले डेंग्यूचे जवळपास 70 टक्के रुग्ण एकट्या आशियात आहेत. डासांच्या या प्रजाती चिकनगुनिया, येलो फीव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. डेंग्यू उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या सर्व ठिकाणी पसरतो.
पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उत्पत्ती आणि प्रसार होतो. या डासा सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी चावतात. एडिस इजिप्ती जातीच्या डासाची मादी अंडी घालण्याच्या कालावधीत बऱ्याचदा चावते. तिने घातलेली अंडी कित्येक महिने जिवंत राहू शकतात. त्या अंड्यांचा पाण्याशी संपर्क आला, की त्या अंड्यांतून नवी पिढी बाहेर येते. गर्भवती स्त्रीला डेंग्यू झालेला असेल, तर तिच्या होणाऱ्या बाळाला (Maternal Transmission) डेंग्यूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यूमुळे बाळाचा जन्म वेळेआधी होण्याचा धोकाही असतो.
डासांची उत्पती
साधारण पावसाळ्यात अनेक ठिकाणी डबकी साचतात अशा ठिकाणी या डासा आळी घालतात. तसेच घरातील उघड्या पाण्याची टाकी, टायरमध्ये साचलेले पाणी, कुंड्या अशा ठिकाणी अळी घालताता. म्हणूनच शासनाकडून जनजागृती म्हणून आठवड्यातून एकदा टाकी रिकामी करून कोरडी करा असे प्रबोधन केले जाते.
डेंग्यूची लक्षणे
जेव्हा ताप १०४ अंश किंवा त्यापेक्षा जास्त असतो तसेच नियमित सलग ७ दिवस ताप असतो अशावेळी डेंग्यूची लक्षणे दिसायला सुरूवात होते. यामध्ये तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस, चक्कर येणे यांपैकी कोणतीही लक्षणं असतील, तर डेंग्यू झालेला असू शकतो.
डेंग्यूचे चार सेरोटाइप्स
डेंग्यूचा विषाणू फ्लॅव्हिव्हिरिडी (Flaviviridae) कुळातला असून, त्याचे चार सेरोटाइप्स (Serotypes) आहेत. DENV-1, DENV-2, DENV-3 आणि DENV-4 असे ते चार प्रकार आहेत. यापैकी कोणत्याही सेरोटाइपच्या विषाणूचा संसर्ग एखाद्या व्यक्तीला झाला आणि ती व्यक्ती त्यातून बरी झाली, तर त्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यभर त्या सेरोटाइपचा संसर्ग होत नाही. त्या व्यतिरिक्त अन्य सेरोटाइपचा संसर्ग मात्र होऊ शकतो
उपचार
डेंग्यूचं निदान स्पष्ट झाल्यावर डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्या. योग्य असा सकस आहार, आहारामध्ये फळांचा वापर करा. गरम पाणी भरपूर प्या. विश्रांती घ्या.
प्रतिबंधच महत्त्वाचा उपाय
डेंग्यू व्हायला नको असेल किंवा एकापासून दुसऱ्याला पसरायला नको असेल, तर उपचारांपेक्षा प्रतिबंध (Prevention) करणंच उत्तम आहे. त्यामुळे डासांचं नियंत्रण हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. एखाद्या व्यक्तीला डेंग्यू असल्याचं निदान झालं, तर त्या व्यक्तीला आजारी असताना डास चावणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण त्या व्यक्तीला डास चावून तोच डास दुसऱ्या व्यक्तीला चावला तर संसर्ग पसरू शकतो.घरात कुंडीत पाणी साचू देऊ नका. पाण्याची टाकी उगडी ठेवू नका. त्यावर झाकण ठेवा. घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी झाकून ठेवा. ओडोमाॅसचा वापर करा.
डेंग्यूचा प्रसार कसा होतो,काय आहेत लक्षणे आणि उपचार;वाचा सविस्तर
Advertisements