ग्रामपंचायत औषध फवारणी करणार कधी? : नागरिकांमधून संताप
कुंभोज/वार्ताहर
कुंभोज ता हातकणंगले येथे दोन दिवसापूर्वी तहकूब झालेल्या ग्रामसभेमध्ये घंटागाडी चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याच पद्धतीने डेंगू वरती उपाय योजना म्हणून गावात फाँग मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी व गावात सर्वत्र जंतुनाशक पावडर फवारणी करण्याचा निर्णय गाव सभेत घेण्यात आला होता. परंतु गावसभा उलटून चार दिवस झाले तरीही अद्याप घंटागाडी का चालू झाली नाही व डेंगूची औषध फवारणी ही केली नाही? मग ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ग्रामसभेत दिलेल्या आश्वासनांच काय झालं? ग्रामपंचायत डेंगूचा फैलाव होऊ नये यासाठी गावात औषध फवारणी डेंगू सर्वत्र पसरल्यावर करणार का? असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत असून सध्या कुंभोज परिसरात १५ पेक्षा जास्त डेंगूचे रुग्ण आढळले असून गावात भीतीचे वातावरण आहे.
कुंभोज ग्रामपंचायत व नूतन ग्रामविकास अधिकारी यांनी गावाकडे विकासाच्या दृष्टीने पाहून सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, परिणामी नूतन असलेल्या ग्रामसेवकांनी कार्यालय सोडून जरा गावाचा बाहेर पडून अभ्यास करावा. गावातील महत्त्वाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक लक्ष द्यावे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे.
परिणाम गेल्या काही वर्षापासून औषध फवारणी मशीन बंद असल्याने सदर मशीन चालू करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता, मग अजून ते मशीन बंदच का मशीन चालू करण्यासाठी ग्रामपंचायतला आणखी किती काळ लागेल? गटर वरती औषध फवारणी अद्याप का झाली नाही. घनकचरा प्रकल्पाचे काय झालं. घंटागाडी चालू करण्याचा निर्णय झाला मग अजून घंटागाडी बंदच का असे वेगवेगळे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून निर्माण होत असून सध्या ग्रामपंचायत विकास कामाबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु ग्रामपंचायतीचे उत्तर देण्यास मात्र असमर्थ असल्याचे चित्र दिसत आहे.