बेळगाव : लोककल्प फौंडेशन आणि केएलई डेंटल हॉस्पिटल बेळगावतर्फे जागतिक आरोग्यदिनी आमटे गावात दंतचिकित्सा शिबिर आयोजित केले होते. आमटे गाव हे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने दत्तक घेतलेले असून ते मध्यम लोकसंख्येचे गाव आहे. केएलई हॉस्पिटलचे दंततज्ञ डॉ. मेहुल शहा, डॉ. प्राजक्ता चव्हाण, डॉ. संदेश, डॉ. रिजुल आणि डॉ. प्रतीक यांनी या शिबिराचे संचालन केले. लोकांच्या दातांच्या सर्व समस्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे, टूथपेस्ट व टूथब्रशचे मोफत वाटप करण्यात आले. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशनचे अजित गरगट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली. लोककल्प फौंडेशनचे स्वयंसेवक प्रितेश पोतेकर, अनंत गावडे, संतोष कदम कार्यक्रमावेळी उपस्थित होते. या शिबिराचा 150 हून अधिक जणांनी लाभ घेतला.
Previous Articleरमजानसाठी सुक्या मेव्याला पसंती
Next Article मतदान जागृतीसाठी कॅन्डल रॅली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.