प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फाउंडेशनने बेळगावच्या केएलई दंत महाविद्यालयासोबत 7 नोव्हेंबर रोजी माध्यमिक विद्यालय जांबोटी येथे दंतचिकित्सा शिबिर आयोजित केले होते. जवळपास 220 विद्यार्थी, शिक्षकांसह आणि गावकऱयांनीही या शिबिरात भाग घेतला.
लोककल्प फाउंडेशन आणि केएलई डेंटल कॉलेजतर्फे राष्ट्रीय ब्रश दिनाच्या पूर्वसंध्येला या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरि÷ दंतचिकित्सक आणि साहाय्यक कर्मचाऱयांच्या गटाने इयत्ता 7 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यापक दंततपासणी शिबिर आयोजित केले. शिबिराची सुरुवात दंत जागरुकता भाषणाने करण्यात आली. विद्यार्थ्यांना दातांच्या सामान्य आजारांबद्दल, विशेषतः दात किडणे आणि हिरडय़ांचे आजार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांवर भर देणे, विद्यार्थ्यांना खाण्याच्या पद्धती आणि खाद्य पदार्थांच्या निवडींवर प्रकाश टाकण्यात आला. विद्यार्थ्यांना डॉक्टरांशी संवाद साधून तोंडाच्या आजारांविषयी माहिती मिळविण्याची संधी मिळाली.
दंततपासणी पूर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला ब्रश आणि टूथपेस्ट सेट देण्यात आला. मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी दंत विभागप्रमुख डॉ. अनिल अंकोला, डॉ. सागर जालिहाल आणि केएलई डेंटल कॉलेज व्यवस्थापनाचे शाळेला दिलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल आभार मानले.
लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, अनंत गावडे, प्रितेश पोटेकर, सुहासिनी पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.