प्रतिनिधी/ बेळगाव
भाग्यनगर, मंडोळी, टिळकवाडी, अनगोळमाळ या शाखांच्यावतीने शनिवारी मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अनेक सभासदांनी भाग घेऊन दातांची तपासणी करून घेतली.
डॉ. स्नेहा गुलजर डॉ. निकिता गुलजर यांनी नागरिकांची दंत तपासणी करून दातांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शाखेचे व्यवस्थापिका ज्योती गंभीर, मनिषा नुगानट्टी, ज्योती रेगे, प्रसाद नाडगौडा यासह इतर उपस्थित होते.