उचगाव : विठुरायाचा जयघोष करत उचगाव परिसरातील वारकऱयांनी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला सोमवारी प्रस्थान केले.
येथील वारकरी मोठय़ा संख्येने दरवषी पंढरीची वारी करतात. शेतीतील कामे संपवून भक्तमंडळी पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. उचगाव परिसरातील उचगाव, मण्णूर, आंबेवाडी, गोजगा, सुळगा, कल्लेहोळ या भागातील अनेक वारकरी यावषी पायी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. सोमवारी सकाळी उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाईच्या प्रांगणातून दिंडीला प्रारंभ झाला. 10 जुलै रोजी आषाढी एकादशीला ते पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. या वारीबरोबरच बस, टेम्पोने हजारो विठ्ठलभक्त पंढरीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.