पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा या तीन परीक्षांसाठी वर्णनात्मक स्वरुपाचा नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम 2023 मध्ये आयोजित परीक्षांपासून लागू केला जाणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षेअंतर्गत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठीचे सुधारित अभ्यासक्रम एमपीएससीने प्रसिद्ध केला आहे. त्यात अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 24 जानेवारीला, तर कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम एक फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षांपासून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिक वाचा : …तोपर्यंत प्रचारात सहभागी होऊ नका; मनसेच्या कार्यकर्त्यांना सूचना