Tarun Bharat

जुन्या विधानसभेचे रेकॉर्ड नष्ट

Advertisements

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : आमदार प्रशिक्षण कार्यशाळा सुरु

प्रतिनिधी /पणजी

पणजी येथील विधानसभा पर्वरीत स्थलांतरीत करताना आधीच्या जुन्या विधानसभेचे रेकॉर्ड, दस्तऐवज नष्ट झाल्याची किंवा फ्sढकून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पणजीतील ताज विवांता हॉटेलमध्ये आमदारांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशळेचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. सभापती रमेश तवडकर उपस्थित होते, त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

  राज्य विधानसभेचे सर्व रेकॉर्ड, नोंदी, दस्तऐवज यांचे डिजिटल स्वरूपात संवर्धन करावे आणि सभापती रमेश तवडकर यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. आपण 2012 मध्ये सभापती असताना त्याकरीता प्रयत्न केले. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे राज्य विधानसभेचे एकंदरीत रेकॉर्डच मिळाले नाहीत.

मुख्यमंत्री, सभापतींची भाषणे गहाळ

राज्याचे पहिले मुख्यमंत्री व सभापती यांची भाषणे उपलब्ध नाहीत. गोवा विधानसभ्sाचा इतिहास महत्त्वाचा आहे आणि तो 1963 पासून मिळणे गरजेचे आहे. सध्या गोवा विधानसभेचे जे काही रेकॉर्ड उपलब्ध आहेत ते डिजिटल पध्दतीने राखून ठेवणे आवश्यक आहे. सभापतींनी ते काम करावे, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.

नवीन आमदारांना शिकवण्यासाठी व मार्गदर्शनाकरीता हे रेकॉर्ड महत्त्वाचे असून ते कोणी नष्ट केले किंवा फ्sढकून दिले तेच कळत नाही. आधीच्या नेत्यांची विधानसभेतील भाषणेही उपलब्ध नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी निदर्शनास आणले.

आमदारांसाठी अभ्यास दौरा

ग्रामीण विकास व मोठय़ा राज्यातील आमदारांचे कार्य समजून घेण्यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा अभ्यास दौरा आमदारांसाठी आखण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

कर्तृत्व दाखविण्यासाठी आमदारांना विधानसभेचे व्यासपीठ महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतफ्xढ गोवा विधिमंडळ सचिवालयाच्या सहकार्याने सदर कार्यशाळा आयोजित केली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शन केले.

विरोधी आमदारांचा बहिष्कार

विरोधी काँगेस, आप व आरजीच्या आमदारांनी प्रशिक्षण कार्यशाळेवर बहिष्कार घातला. ती कार्यशाळा पंचतारांकित हॉटेलात घेण्याची गरज नव्हती. तो विनाकारण खर्च टाळता आला असता आणि सदर कार्यशाळा विधानसभा संकुलात घेण्याची गरज होती, अशी कारणे विरोधी आमदारांनी दिली आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था भाजप, आरएसएसशी संबधीत आहे. त्यामुळे ती भाजपची कार्यशाळा असल्याचे चित्र दिसल्यामुळे तेथे जाण्याचे टाळल्याची माहिती विरोधी आमदारांनी दिली.

Related Stories

यंदा स्वरमंगेश संगीत व नृत्य महोत्सव होणार नाही

Patil_p

मगो पक्षाची धुरा युवा पिढीच्या हाती देणार

Amit Kulkarni

डॉ. प्रमोद सावंत आता काळजीवाहू मुख्यमंत्री

Patil_p

काँग्रेसची सूत्रे आजपासून नव्या दमाच्या नेत्यांकडे

Amit Kulkarni

पक्षासाठी केलेल्या कार्याची आर्लेकरांना पोचपावती मिळाली : लोबो

Amit Kulkarni

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत श्याम गांवकर प्रथम

Omkar B
error: Content is protected !!