वार्ताहर /किणये
संतीबस्तवाड येथील तालीम कट्टा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत देसूर येथील एकदंत कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.तर दुसरा क्रमांक तालीम कट्टा संघाने मिळविला.
या स्पर्धा नावगे क्रॉस येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या समोर मोठय़ा उत्साहात झाल्या. स्पर्धेत एकूण 32 कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता. कबड्डी संघ उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसप्पा बिरमूती हे होते. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मल्लकार्जुन राशिंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष देमाणा नाईक, सदस्य रामलिंग कर्लेकर, अजय चनीकोपी, सुनीता जांगळे ,बाबाजी पावशे, संतोष पुजारी , प्रसाद सडेकर आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघो बेर्जे यांनी केले. बक्षीस वितरण विशाल मिसाळे व तालीम कट्टा संघातील कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले.