Tarun Bharat

ठिय्या आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार

म. ए. समितीकडून मराठी भाषिकांना आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठी भाषिक नागरिकांना मराठीतून सरकारी कागदपत्रे मिळावीत, या मागणीसाठी सोमवार दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी भाषिकांना मराठीत कागदपत्रे मिळावीत, असा आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाकडून मराठी भाषिकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सोमवारी होणाऱया ठिय्या आंदोलनावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून मराठी भाषिकांनी आपला मराठी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन केले आहे.

मराठी कागदपत्रांसाठी 1 जून रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून मराठी भाषिकांनी जिल्हा प्रशासनावर दबाव घालण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलने करूनही जिल्हा प्रशासनाकडून मराठी कागदपत्रांसाठी कोणतीच हालचाल केली जात नसल्याने अखेर सोमवार दि. 8 रोजी ठिय्या मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिय्या मोर्चासाठी गल्लोगल्ली, गावोगावी जागृती केली जात आहे.

माजी नगरसेवकांचा ठिय्या आंदोलनाला पाठिंबा

महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या न्याय व हक्कांसाठी लढा देत आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार मराठी भाषिक कागदपत्रांसाठी लढा देत आहेत. त्यामुळे ठिय्या आंदोलनाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार माजी नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी झालेल्या या बैठकीला माजी महापौर महेश नाईक, शिवाजी सुंठकर, किरण सायनाक, सरिता पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक दिनेश राऊळ, ऍड. रतन मासेकर, नेताजी जाधव, राजू बिर्जे, मेघा हळदणकर, सुधा भातकांडे, मनोहर हलगेकर, विनायक गुंजटकर, विजय भोसले, मोहन भांदुर्गे यांसह इतर उपस्थित होते.

शिवसैनिक

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱया ठिय्या आंदोलनाला मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित राहतील, असा निर्धार शिवसेना सीमाभागतर्फे शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर उपप्रमुख राजकुमार बोकडे, माजी उपजिल्हाप्रमुख महेश टंकसाळी, विभाग प्रमुख दत्ता पाटील, राजू कणेरी, विजय सावंत, बाळू माचरणकर, अथांग जाधव, पप्पू भादवणकर, राजू निलजकर, शिवाजी जोगाणी, रमेश माळवी यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

नीना स्पोर्ट्स संघाकडे पर्सिस्टंट चषक

Amit Kulkarni

सुरळीत पाणीपुरवठय़ास दिरंगाई, निम्म्या शहरात पाणीटंचाई

Amit Kulkarni

शॉर्टसर्किटने फुलबाग गल्ली येथील घराला आग

Amit Kulkarni

युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे

Amit Kulkarni

शिवसेनेने बुजविले स्वखर्चाने खड्डे

Amit Kulkarni