Tarun Bharat

पीएफएमएस प्रणालीद्वारे विकास निधी वितरण होणार

विनय गौडा जी सी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ सातारा

केंद्र शासनाच्या सर्व योजनांना पीएफएमएस प्रणाली लागू झालेली आहे. ही प्रणाली  ही आनलाईन असल्याने सहा.लेखाधिकारी यांनी अत्यंत काळजीपुर्वक निधी वर्ग करावा. या प्रक्रियेत कोणती ही हालगर्जी करु नये, जेणे करुन अनुदान हे नेमक्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.

 जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पीएफएमएस प्रणालीचे नुकतेच प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशनचा घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व सार्वजनिक शौचालया या विकास कामांचा व वैयक्तिक शौचालयाचा प्रोत्साहन निधी लाभार्थींना वेळेत, तात्काळ वितरित होण्यासाठी पीएफएमएस प्रणालीचा वापर करण्यात यावा, यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा निधी यापुढे पीएफएमएस प्रणालीद्वारे गावाच्या व वैयक्तिक लाभांच्या लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करावा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी सातारा जिह्यातील सर्व पंचायत समितीतील लेखा अधिकारी, गट संसाधन केंद्राचे अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते.

 प्रशिक्षणामध्ये लेखाधिकारी सुनील जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग केदार डोंबे,  स्वच्छता विभाग राजेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे  विभागीय अधिकारी चितलांगे, नोडल अधिकारी बिराजदार व निकम यांनी खाते हाताळणे बाबत मार्गदर्शन केले उपस्थित होते. जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती सुषमा देसाई, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता किरण सायमोते आदी मान्यवर उपस्थित होते. अजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. या प्रशिक्षणासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी अल्पना बंगाळे, जिल्हा सल्लागार धनाजी पाटील, संजय पवार, रवींद्र सोनवणे, ऋषिकेश शीलवंत, नीलिमा सन्मुख, गणेश चव्हाण, विक्रम गाडगे, सचिन जाधव उपस्थित होते

Related Stories

सातारा : हरिहरेश्वर बँकेत 37 कोटी 46 लाखांचा गैरव्यवहार, 29 जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

datta jadhav

Anil Deshmukh case: ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत- शरद पवार

Archana Banage

लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

Patil_p

सवलतीने अन्नधान्याची आवश्यकता नसलेल्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे

Archana Banage

साताऱयात तीन जुगार अड्डा चालकांना दणका

Patil_p
error: Content is protected !!