Devendra Fadnvis : कर्मचाऱ्यांना योग्य पेन्शन मिळाली पाहिजे.निवृत्ती नंतर सगळेच बेनिफिट मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन जेष्ठ माजी अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन केली आहे.आम्ही युनियनला विनंती करतो की त्यांनी त्यांच्यासमोर जाऊन भूमिका मांडावी. यानंतर अहवाल तयार केला जाईल.त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. राज्य आपलं आहे, संप मागे घ्या असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, काही संघटनांनी यामध्ये आडमुठी भूमिका घेतली आहे. मात्र काही संघटनांनी चांगली भूमिका घेतली. विशेषत:प्राथमिक शिक्षक संघटनेने कमिटीसमोर म्हणणे मांडून मार्ग काढू अशी भूमिका घेतल्याचे सांगितले. आरोग्य संघटनेने देखील कमिटीला मान्यता दिली.माझी इतर संघटनेला विनंती आहे की, राज्य आपलचं आहे संप मागे घ्या असे आवाहन करत असतानाच ज्या संघटना संपातून बाहेर पडत आहेत त्यांच स्वागतही केलं.

