ऑनलाईन टीम/ तरुण भारत
विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. सध्या प्रकती स्थिर असून विश्रांती घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. काल अकोला दौऱ्या दरम्यान त्यांनी ताप आल्याने त्यांनी दौरा अर्धवट सोडला. तसेच पूर्वनियोजित सोलापूरचा दौरा देखील रद्द करण्यात आला.
काल मुंबईत दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी स्वॅब टेस्टिंगसाठी दिलं होतं. यात त्यांचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला असून कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान फडणवीसांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.