Tarun Bharat

‘ओबीसी आरक्षण रद्द करणे हे षडयंत्र’ – फडणवीस

Advertisements

ऑनलाईन टीम/भारत

ओबीसी आरक्षण हातातून घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. महाविकास आघाडी सरकारने यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, राज्यात ओबीसी आरक्षणावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जुंपली आहे. दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज भाजपच्या पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

आम्ही जे वारंवार म्हणतो, की ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे, असं टीकास्त्र फडणवीसांनी राज्य सरकारवर डागलं.

ओबीसी आरक्षणावर आपण सातत्याने संघर्ष करीत आहोत. डिसेंबर १९ ते मार्च २२ या काळात केवळ वेळकाढू धोरण राज्य सरकारने राबविले. जी कार्यपद्धती मध्य प्रदेश सरकारला कळविली, तीच महाराष्ट्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितली. पण मध्य प्रदेश जे करू शकले, ते महाराष्ट्राने केले नसल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.

Related Stories

जुंगटीतील बेस्ट बस चालकाचा मुंबईत कोरोनाने मृत्यु

Patil_p

कर्नाटकात दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Archana Banage

मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देणार : अजित पवार

Tousif Mujawar

कोरोनाची धास्ती : अहमदाबादमध्ये आज रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू

Tousif Mujawar

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

Tousif Mujawar

‘तुमचा भुजबळ करू’ म्हणणाऱ्यांना कोर्टाने उत्तर दिलं : मंत्री भुजबळ

Archana Banage
error: Content is protected !!