Tarun Bharat

कोणताही निर्णय परस्पर जाहीर करु नका; फडणवीस भडकले

प्रसिद्धिसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणाऱ्या मंत्र्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. सारासार विचार न करता घोषणा करु नका. कोणताही निर्णय परस्पर जाहीर करु नका. असे खडेबोल फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांना सुनावले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही समज दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

काल सोमवार (ता. १२) रोजी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्रातील योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ठ करून शेतकऱ्यांना मदत योजना सुरू करण्यासंदर्भात विचारमंथन सुरू होते. दरम्यान, यासंदर्भातील माहिती बातमी प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाली.ही बाब फडणवीसांना समजली असता त्यावरुन मंत्रीमंडळ बैठकीतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं. आणि ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झाला नसताना ही माहिती तुम्ही जाहिर कशी केली.? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला असल्याची माहिती समोर आली.

Related Stories

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

datta jadhav

महाराष्ट्र : आरोग्य विभागात आजपासून भरतीप्रक्रिया सुरू

Tousif Mujawar

मुंबईत होळी, धुलिवंदन उत्सव साजरा करण्यास मनाई; पालिकेचा निर्णय

Tousif Mujawar

वेरुळी सोमेश्वरवाडी परिसरात बिबटय़ाचा वावर

Patil_p

ओडिशा सरकारने 30 एप्रिल पर्यंत वाढवला लॉक डाऊनचा कालावधी

prashant_c

लालूप्रसाद यादव यांना झटका; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Tousif Mujawar