Tarun Bharat

भाजपचे ‘मिशन 45’,लोकसभेच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणीस

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

लोकसभेच्या जागेवर आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत आहोत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं मिशन 45 आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश बैठकित घेण्यात आल्य़ाची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. मोदींनी (Narendra Modi)केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही यावेळेस त्यांनी दिल्या.

पुढे बोलताना ते म्हणाले, न जिंकलेल्या मतदारसंघावर आमचं लक्ष आहे. सोळा मतदारसंघात जुलै महिन्यात केंद्रीय मंत्र्यांचा दौरा आहे. योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आदेश या बैठकीत देण्यात आला आहे. राष्ट्रपती पदासाठी एनडीए जो उमेदवार ठरवेल तोच उमेदवार निवडून येईल. अग्निपथ योजनेबाबत लोकांमध्ये गैरसमज आहे अग्निपथ योजनेमुळे मुळ सैनिक भरती रद्द होणार नाही असेही ते म्हणाले.

हेही वाचा- ये तो अभी झाँकी है, और बहोत बाकी है;नाना पटोलेंचा भाजपला इशारा

राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांची चौकशी कोर्टाच्या आदेशावरून होत आहे. काँग्रेसचे आंदोलन चुकीचे आहे. देहू येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात अजित पवार यांना बोलण्यास संधी दिली नसल्याने राष्ट्रवादीकडून टीका होत आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले, पंतप्रधानानी स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव का नाही अशी विचारणा केली. मात्र पंतप्रधान आणि अजित पवार यांच्यामध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या. आज राष्ट्रवादी जे आंदोलन करत आहेत त्यांचचं अजित दादांविरोधात शडयंत्र आहे अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.

Related Stories

कोल्हापूर : मलकापुरातील ‘त्या’ बेपत्ता युवकांचा मृतदेह सापडला

Abhijeet Shinde

कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्रीय कॅबिनेटने केली ‘ही’ घोषणा

Abhijeet Shinde

… म्ह्णून पुण्यात उभारलेल्या मंदिरातून मोदींचा पुतळा हटवला

Abhijeet Shinde

अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार,तरुणास अटक

Abhijeet Shinde

साताऱ्यात कोविड रुग्णांवर बाऊर्न्सची दहशत

datta jadhav

प्रेमाचा गेम सेम टू सेम : दिगंत पाटीलच्या गिल्ट संहितेला १० लाखांचे पारितोषिक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!