Tarun Bharat

गुजरातचा विकास भाजपच करु शकतो सिध्द झाले- देवेंद्र फडणवीस

Gujrat Assembly Election Results 2022 : नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो. 52 टक्के मतं भाजपला मिळाली. गुजरातचा विकास भाजपच करू शकतो हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.आप नावाच्या पक्षाचे गुजरातमध्ये पुरते बारा वाजले. ‘आप’ला जनतेनं नाकारलेलं आहे. आप पार्टी ही दिल्लीपुरती मर्यादित आहे हे आता सिध्द झाल आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. गुजरातमध्ये भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रचाराला गेलो तेव्हाच गुजरातचा मूड दिसून येत होता. जिथे जिथे सभेला गेलो तिथे मोदींच्या नावाचा जयघोष दिसून येत होता. गुजरातमध्ये (Gujrat) निवडून आलेल्या सर्व आमदारांना शुभेच्छा. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच तसेच प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील (C .R .Patil) आणि गुजरातच्या नागरीकांचे यावेळी त्यांनी आभार मानले.

हेही वाचा- गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची दाणादाण,काय आहे विश्लेषकांचा अंदाज, जाणून घ्या एका क्लिकवर


भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये नविन इतिहास रचला आहे. आजपर्यंतचे सगळे रकॉर्ड तोडून जवळपास 157 जागांवर भाजपने विजय मिळवला. एक अप्रत्यक्षित पण अपेक्षित असा विजय मिळवला आहे. 27 वर्षानंतर पुन्हा एकदा निवडणुकीत भरघोस यश मिळवलं आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेसचा सूपडासाप झाला आहे असेही ते म्हणाले.

Related Stories

कराडात 52 हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण

Patil_p

फॉलोअर्स वाढविण्यासाठी बिंदास काव्या स्वत:हून गायब; आई-वडिलांनी रचला होता बनाव

datta jadhav

गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटरवरून शुभेच्छा

Archana Banage

”छगन भुजबळांचे आंदोलन म्हणजे ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न”

Archana Banage

अखेर वनपाल गावितही बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात

Patil_p

भाजप सरकारच्या हायब्रीड ऍन्युटी रस्ते प्रकल्पांची चौकशी करा – मंत्री मुश्रीफ

Archana Banage