Tarun Bharat

देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन; म्हणाले, …म्हणून पंकजा मुंडेना उमेदवारी दिली नाही

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई: विधान परिषदेत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी न दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले. तर राजकीय वर्तुळातही भाजपच्या या वागण्याने वरिष्ठ नेत्यांनी नाराजीचा सुर ओढला. पंकजा मुंडे यांना डावलून भाजपा (BJP) महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजातून येणाऱ्या उमा खापरे यांना आमदारकीसाठी उमेदवारी दिली. यावरुन राज्यात उलट-सुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाला वाढवले. मात्र त्यांच्या कामाची दखल भाजपाने घेतली नसल्याचे काही दिवसापासून बोलले जात आहे. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं. आणि पंकजाताईंना उमेदवारी का दिली नाही याचं कारण स्पष्ट केलं.

हेही वाचा- तुकोबांची शिळा ही भक्ती, आधाराचं केंद्र

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले, भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे. आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत. पंकजाताई भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. तिथे आता निवडणुका आहेत, तिथला प्रभार पंकजाताई सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पंकजाताईंची काळजी कोणी करू नये असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा- सीएम योगी सुपर सरन्यायाधीश’; ओवैसींची टीका

विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा केंद्रीय पातळीवरुन झाल्याचं सांगत उमेदवारी निवडप्रक्रियेत राज्याचा काही सहभाग नव्हता असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलं.

Related Stories

उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

datta jadhav

मागील 24 तासात 2 पोलिसांचा मृत्यू; आणखी 154 कोरोनाबाधित

Rohan_P

एसटी कामगार संघटनेने केले आक्रोश आंदोलन

Abhijeet Shinde

तैवानला चीननं चारही बाजूंनी घेरलं; हवाई, जलमार्गावर नाकाबंदी

datta jadhav

बार्शीत मद्यपींचा दारू पिण्याचा परवाना काढण्याकडे कल

Abhijeet Shinde

सोलापूर : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळाला मोदींशी बोलण्याचा मान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!