महिलांमध्ये मोठा उत्साह, देवीच्या विसर्जनावेळी भाजी भाकरीचा आस्वाद. घराघरांमध्ये देवी व हौशे
डिचोली/प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गौरी पुजनाचा पारंपरिक उत्सव मोठय़ा उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सकाळी परंपरेप्रमाणे वाडय़ावरील विहीर किंवा नदीवरून कलशात पाणी आणि विविध समान म्हणजेच देवीचे आगमन घराघरांत झाले. उपवसाधारी सुवासिनी पारंपरिक वेशात देवी पूजनाच्या उत्सवात सहभागी होताना दिसल्या.
डिचोली तालुक्मयातील विशेषतः ग्रामीण भागात देवी पुजण्याची प्रथा फार मोठी आणि गणेश चतुर्थीइतकीच महत्त्वाची आहे. सकाळी विविध वाडय़ांवर तसेच गावांमधील विहिरी, नदीवर देवी आणण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. संध्याकाळी या देवीचे ज्या ठिकाणाहून आणलेल्या जागीच विसर्जन करण्यात आले. या विसर्जनानंतर भाविकांना पाच पाल्यांची भाजी व भाकरी वितरीत केली. या भाजी भाकरीसाठी लोकांची झुंबड उडाली.
गावकरवाडा मये येथील देसाई, सावंत, तोरसकर, बोर्डेकर, शेटय़े व रेडकर कुटूंबांची देवी एकत्र साजरी केली. गावकरवाडा मये येथील देसाई यांच्या विहिरीवर देवीच्या स्वागतासाठी महिलांनी सकाळी गर्दी केली होती. मये गावाप्रमाणे तालुक्मयातील ग्रामीण भागात मोठा उत्साह दिसून आला.