चिंचली यात्रेला आल्यावर काळाचा घाला : कुडची येथे आंघोळ करताना दुर्घटना
वार्ताहर /कुडची
रायबाग तालुक्यातील मायाक्का चिंचली यात्रेसाठी आलेल्या भाविकाचा कुडची येथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. युवराज शिवाजी जाधव (वय 25, मूळगाव पळशी, ता. खानापूर, सध्या रा. मुंबई) असे मृत तऊणाचे नाव आहे. युवराज जाधव हा आपल्या भावासह मायाक्का चिंचली यात्रेसाठी आला होता. दरम्यान चिंचली येथे जाण्यापूर्वी कुडची येथे कृष्णा नदीवर आंघोळीसाठी थांबला होता. कृष्णा नदीच्या उगारकडील काठावर आंघोळ करीत होता. याचदरम्यान त्याला भोवळ आल्याने तो नदीत बुडाला. तसेच तो बुडालेला परिसरातील पात्रात खोल ख•s व गढूळ पाणी आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात भाविक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर शोधकार्य करून मृतदेह पात्राबाहेर काढला. कुडची शासकीय इस्पितळात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कागवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.