Tarun Bharat

संत फ्रान्सिस झेवियर फेस्तसाठी भाविक रवाना

प्रतिनिधी /बेळगाव

घाटामाथ्यावरील विविध गावांमधून आणि शहरांमधून सुमारे 700 यात्रेकरू जुने गोव्याच्या पदयात्रेला निघाले आहेत. कोल्हापूर, पुणे आणि बेळगाव जिह्यातून आलेल्या काही यात्रेकरूंनी सोमवारपासून तर काहींनी मंगळवारी यात्रेला सुरुवात केली. 2 डिसेंबर रोजी सुमारे 700 यात्रेकरू ’गोयचो सायब’ अर्थात संत फ्रान्सिस झेवियर यांच्या चरणी आपली कैफियत आणि विनवणी मांडण्यासाठी जुने गोव्यात शुक्रवारी पोहोचणार आहेत.

उत्तर कर्नाटक प्रदेशातील स्वामी संप्रदायाचा स्वीकार करणारे जेसुइट स्वर्गीय फादर प्रभूधर यांनी यात्रेला सुरुवात केल्यापासूनचे हे 42 वे वर्ष आहे. पश्चिम कोल्हापूर तालुक्मयातील आजरा शहरातून अवघ्या सात यात्रेकरूंना घेऊन सुरू झालेली पदयात्रा आता बेळगाव आणि कोल्हापूर जिह्यातील लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. मुंबई, पुणे आणि इतर महानगरांतील सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अनुयायी या यात्रेत सहभागी होत आहेत. खानापूर येथील धर्मगुरु कुस्तस लिमा म्हणाले, या यात्रेत पुजारी, धार्मिक आणि सामान्य व्यक्तींशिवाय इतर धर्मातील महिला, पुरुष आणि लहान मुलेही सहभागी होतात.

बेळगावसह खानापूर, गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर, इचलकरंजी येथील यात्रेकरूंनी सोमवारपासून यात्रेला सुरुवात केली. मंगळवारी पदयात्रेला निघालेले बेळगाव व खानापूर येथील भाविक जांबोटी, चोर्लामार्गे चालत जात जुने गोव्याला 2 डिसेंबरला पोहोचणार आहेत.

Related Stories

संकेश्वरात बाप्पांना भावपूर्ण निरोप

Patil_p

शिंदोळीतील दुहेरी खून क्षुल्लक कारणातून

Amit Kulkarni

दुसऱया आठवडय़ाचा विकेंड लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी

Amit Kulkarni

तीन वर्षांनंतरही ‘त्या’ 11 जणांचा शोध नाही

Amit Kulkarni

जीएसएस बीसीएतर्फे नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

tarunbharat

संकेश्वरच्या नगराध्यक्षपदी सीमा हतनुरी

Patil_p