Tarun Bharat

सौंदत्ती डोंगरातून परतले भाविक

बेळगाव – शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती यल्लमा डोंगराकडे मार्गस्थ झालेले कंग्राळी बुद्रुक येथील भाविक मंगळवारी आपल्या गावी परतले व धार्मिक विधी येथे पार पाडल्या. कंग्राळी बुद्रुक येथील सर्व भाविक शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती श्री रेणुका यल्लमा डोंगराकडे गेल्या आठवड्यात रवाना झाले होते. त्यांनी त्या ठिकाणी आठ दिवस मुक्काम केल्यानंतर तसेच सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर आज गावाकडे परतले आहेत आणि पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पाडला. भंडाऱ्याच्या उधळणीत देवीचे स्वागत केल्यानंतर सर्व भाविक या ठिकाणी आपल्या हातून कोणती चूक झाली असल्यास क्षमा कर आणि आमच्या हातून तुझी कायम सेवा करून घे अशी प्रार्थना केली.कंग्राळी बुद्रुक या गावात दर तीन वर्षांनी एकदा अशाच प्रकारे गावामध्ये देवीचा जल्लोष करण्यात येतो.

Related Stories

खानापूर तालुक्याला विशेष अनुदान मंजूर करा

Amit Kulkarni

विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून अधिकारी धारेवर

Patil_p

दुचाकीस्वाराला वाचविताना बस गटारीत अडकली

Amit Kulkarni

सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू, पण वर्ग नाही

Patil_p

सद्गुरुंच्या कृपेनेच मनुष्य देहाचा उद्धार

Patil_p

समर्थ सोसायटीच्या टिळकवाडी शाखेसाठी भूमीपूजन

Patil_p
error: Content is protected !!