Tarun Bharat

दुर्गामाता दौडमुळे तालुक्यात भक्तिमय वातावरण

Advertisements

वार्ताहर /कडोली

दुर्गामाता दौडमुळे युवकांत नवचैतन्य

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जाफरवाडी येथे आयोजित दुर्गामाता दौडमुळे नवचैतन्य निर्माण झाले असून घटस्थापनेपासून सुरू झालेल्या दुर्गामाता दौडला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

शुक्रवारी काढलेल्या दौडमध्ये तरुण व तरुणी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. ग्रामदैवत बसवाण्णा मंदिरासमोर ज्ञानेश्वर मुतगेकर, कुशल मुतगेकर,  नंदीश पाटील, विशाल रामचंद्र पाटील, अक्षरा, वैष्णवी, प्रीती आदींच्या हस्ते ध्वजपूजन, शस्त्रपूजन करून दौडला प्रारंभ करण्यात आला. दौड गुंजेनहट्टी येथे नेण्यात आली. याठिकाणी महिलांनी आरती ओवाळून दौडचे स्वागत केले. जाफरवाडी येथे दौडीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गल्लीमध्ये आकर्षक रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. दौडच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भगव्या पताका लावल्या होत्या. दिवसेंदिवस दौडमध्ये तरुण-तरुणींची संख्या वाढत असून ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून जात आहे. ध्येयमंत्राने दौडची सांगता करण्यात आली.

खनगाव येथे दौडला भव्य प्रतिसाद

खनगाव खुर्द येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने आयोजित दुर्गामाता दौडला तरुणाईचा भव्य प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रेरणामंत्राने दौडची सुरुवात झाली. गावातील बसवाण्णा मंदिर, लक्ष्मी मंदिर येथे दर्शन घेऊन गावभर दौड काढण्यात आली. दौडच्या मार्गावर काढण्यात आलेल्या रांगोळय़ा लक्षवेधी ठरत होत्या. गल्लोगल्ली सुवासिनींनी औक्षण करून दौडचे स्वागत केले. प्रभाकर पाटील यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. शिवाजीनगर येथील कामाण्णा मंदिर येथे आरती करून दौडची सांगता झाली. प्रकाश पाटील व अनिल मुंचडीकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.

बाळेकुंद्री खुर्द भागात दौडमुळे भक्तिमय वातावरण

बाळेकुंद्री खुर्द येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडमध्ये विविध देवदेवतांचा जयजयकार करण्यात येत असून स्फूर्तीगीतेही गाण्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण भक्तिमय होत आहे.

दौड दररोज वेगवेगळय़ा गल्लीतून काढण्यात येत आहे. त्यामुळे दररोज तरुणांचा सहभाग वाढत आहे. प्रेरणामंत्राने दौडची सुरुवात करण्यात येत आहे त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून दौड मार्गक्रमण करत आहे. अत्यंत शिस्तबद्धरित्या काढण्यात येणाऱया दौडमध्ये बालचमूंसह तरुण व तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. दौडमध्ये विविध देवदेवतांच्या घोषणा देण्यात येत आहेत. दौडमध्ये भगवे व पांढरे कुर्ते घालून कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

बाळेकुंद्री खुर्द येथे दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

मठ गल्ली बाळेकुंद्री खुर्द येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घटस्थापनेला सवाद्य मिरवणुकीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणण्यात आली. येथील श्री दुर्गादेवी युवक मंडळातर्फे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून मंडळाचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे.

Related Stories

बेळगाव विमानतळाची कृषी उडानमध्ये संधी हुकली

Amit Kulkarni

आता कॅम्पमधील गतिरोधक वाहनधारकांना धोकादायक

Amit Kulkarni

सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धा : केआर शेट्टी संघाकडे सुपर चषक

Amit Kulkarni

श्री महालक्ष्मीदेवी यात्रेवेळी नियमांचे पालन करा

Amit Kulkarni

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

Amit Kulkarni

चिनी वस्तुंची होळी

Patil_p
error: Content is protected !!