प्रतिनिधी /पणजी
शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06.30 वाजता आल्त-बेती श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण मंदिरात चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी शुक्रवार निमित्त श्रावण भक्ती हा सुरेल संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गोमंतकीय गायक डॉ. प्रवीण गावकर व गायिका पल्लवी पाटील हे भक्तीगीत, भावगीत व नाटय़गीत सादर करणार आहेत.
त्यांना तबल्यावर यतीन तळावलीकर, संवादिनीवर धनराज मडकईकर, कीबोर्डवर विष्णू शिरोडकर, पखावजवर किशोर तेली, ऑक्टोपॅडवर प्रकाश आमोणकर व बसरीवर सचिन जगताप (कोल्हापूर) साथ करणार आहेत. कार्यक्रमाचं सुत्रसंचालन कु. मानसी वाळवे करणार आहे. या कार्यक्रमाच्या ध्वनी संयोजनाची बाजू रूदेश फोंडेकर हे सांभाळणार आहेत. मंदिराच्या पूजेचे मानकरी व कार्यक्रमाचे आयोजक सौ. शर्मिला चोडणकर व श्री. शीतल चोडणकर हे आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांना व भक्तांना खुला आहे.