नवी दिल्ली : राष्ट्रकुलसाठी निवड झालेली धावपटू एस. धनलक्ष्मी व तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. त्यामुळे 28 जुलैपासून सुरू होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील संघातून त्यांना डच्चू देण्यात आला आहे.
या दोन्ही खेळाडूंवर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 24 वर्षीय धनलक्ष्मीच्या नमुन्यात विदेशात ऍथलेटिक्स इंटेग्रिटी युनिटने (एआययू) घेतलेल्या उत्तेजक चाचणीत निर्बंधित स्टेरॉईड आढळून आले. ‘एआययूने घेतलेल्या चाचणीत धनलक्ष्मी दोषी आढळून आली असून ती आता बर्मिंगहमला जाऊ शकणार नाही,’ असे एका भारतीय पदाधिकाऱयाने सांगितले. धनलक्ष्मीची राष्ट्रकुलसाठी 100 मी. व 4ƒ100 मी. रिले संघात दुती चंद, हिमा दास, श्रावणी नंदा यांच्यासमवेत निवड करण्यात आली होती. याशिवाय सध्या अमेरिकेतील युजीन येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही तिचा भारतीय पथकात समावेश होता. मात्र व्हिसाच्या समस्येमुळे ती या स्पर्धेसाठी जाऊ शकली नाही.