Tarun Bharat

‘मुन्नाच्या’ विजयावर ‘बंटी’ बोललेच, म्हणाले ‘आम्ही जे करायचं ते रणांगणात करतो

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सांगली: जे करायचं ते रणांगणात ही आपली सवय आहे. शिवाय प्रत्यक्ष लढाईमध्ये आम्ही मैदानात कसं उतरतो हे सगळ्यांना माहीत आहे. अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांनी महाडिक गटाला इशारा दिला. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात 5- 6 वर्षात जनतेतील निवडणुकीतून जनतेचा कल स्पष्ट झाला आहे,असा टोला देखील महाडिक गटाला मंत्री सतेज पाटील यांनी लगावला. सांगलीत (Sangli) पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी इशारा दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)विजय झाले. तुमच्या विजयानंतर कोल्हापूर शहरामध्ये महाडिक गटाकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. तसेच विजयोत्सवा बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण बदलणार असा दावा करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या स्टाईलने महाडिकांच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून सांगली ब्रँडिंग अंतर्गत शहरातील झुलेलाल चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड नामफलकाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज पार पडले.

पंतप्रधान, मुख्यमंत्री एकाच मंचावर; राजभवनातील ‘क्रांतिगाथा’ गॅलरीचे उद्धाटन संपन्न


यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत सत्तांतर होत असतात. कोल्हापूरकर (Kolhapur)म्हणून आम्ही तो स्वीकारतो. पण महाडिकांच्या विजयावर आपण जास्त भाष्य करणार नाही. मात्र गेल्या पाच-सहा वर्षातील जनतेच्या निवडणुकीतून जो कल आहे तो स्पष्ट झाला आहे. तसेच आपण जे काय करतो ते रणांगणात आल्यावरच करतो. आता कोणत्याही जिल्हा परिषद,महानगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका जवळपास नाहीत असेही ते म्हणाले. लढाई आले की आपण मैदानात कसे उतरतो हे सगळ्यांनाचं माहीत आहे अशा शब्दात महाडिक गटाला मंत्री पाटील यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला.

राजशिष्टाचार हा फक्त महाराष्ट्रानेच पाळायचा का?

देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समारंभा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु दिलं नाही यावरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले, नेमकं त्या ठिकाणी व्यासपीठावर काय घडलं हे आपल्याला माहीत नाही. पण जर जाणून-बुजून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रोटोकॉलनुसार भाषण करण्यापासून अडवण्यात आले असेल तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे,असे मत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आगामी विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीकडून जी काही खबरदारी घ्यायची आहे ती घेण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Related Stories

कोल्हापूर : मराठा समाजासाठी १५०० कोटी जाहीर करा

Abhijeet Shinde

सेनेतील १५ आमदारांना उध्दव ठाकरेंचे भावनिक पत्र; म्हणाले,शिवसेनेला बळ दिलेत…

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शहर विकास आराखडय़ाची निविदा वादाच्या भोवर्‍यात

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणाचा कायदा तामिळनाडूच्या धर्तीवर करा : खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

गर्भवतींनाही लवकरच कोरोनाची लस

Abhijeet Shinde

शहापूर : एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग, नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Rohan_P
error: Content is protected !!