Tarun Bharat

सर्वच पक्ष भाजपला मतदान करतील, नेमके काय म्हणाले धनंजय महाडिक

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

मुंबई- राज्यसभा निवडणुकीचा अर्ज माघारी दिवस संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपचे धनंजय महाडिक (Dhanjya Mahadik) यांच्यात थेट लढत होणार आहे. त्याबाबत आज महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टी हे राज्यसभेच्या तिन्ही जागांवर निवडून येतील. त्यासाठी सर्व पक्षांचे आमदार आणि अपक्ष भाजपला मतदान करतील. असा गौप्यस्फोट करत महाडिक यांनी सर्व आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. अनेक विधानसभा आमदार मान-अपमान आणि विकास निधी वरून नाराज आहेत. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होईल असेही धनंजय महाडिक म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदार हे आमच्या संपर्कात आहेत. भाजपचे तिनही उमेदवार निवडून येतील. असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

Related Stories

नगराध्यक्षांनी रूग्णालयातुन घेतला शहराचा आढावा

Patil_p

कोल्हापूर जिल्हा बँकेचे कर्मचारी सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका

Archana Banage

Video : अन् ‘ते’ शब्द कानावर पडताच स्टॅलिन यांच्या पत्नीला अश्रू अनावर

Archana Banage

ओमान येथे अभियंत्यासह तिघे समुद्रात बुडाले

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 1492 वर

tarunbharat

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना धक्का, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश

Abhijeet Khandekar