Tarun Bharat

ठरलंय म्हणणाऱ्यांना भाजपची ताकद दाखवू;धनंजय महाडिकांचा इशारा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

इचलकरंजी (कोल्हापूर) : राज्यसभेच्या निवडणूकीत कोल्हापूरचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) निवडून आल्यानंतर मविआच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान कोल्हापुरात महाडिक आणि सतेज पाटील यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांना भाजपची ताकद दाखवून देऊ. येणाऱ्या निवडणूकीत चित्र बदलणार असल्याचा इशारा धनंजय महाडिक यांनी इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यकमात दिला. दोन दिवसांपूर्वी सांगलीतील कार्यक्रमात सतेज पाटील (Satej Patil) यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली होती. त्याला महाडिक यांनी येथील कार्यक्रमात प्रत्त्युत्तर दिले.

हेही वाचा- भाजपचे ‘मिशन 45’,लोकसभेच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणीस


सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, जिल्ह्यात आमचं ठरलंय म्हणायचं आणि सगळं घ्यायचं, एवढंच सुरू आहे. त्यामुळे विकासकामे सोडून इतर सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू आहेत. मात्र परफेक्ट नियोजन करून येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीचे चित्र बदलणार आहे. आता विजयाची सुरुवात झाली असून, पुढील काळात सर्वच निवडणुकीत केवळ भाजपच दिसेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Related Stories

KOLHAPUR; पावसाच्या तडाख्यात जिह्यातील ६ नगरपालिकांची रणधुमाळी, 18 ऑगष्टला मतदान

Rahul Gadkar

गवशी येथे विजेचे चार खांब कोसळले; लहान मुलांसह नागरीक थोडक्यात बचावले

Abhijeet Shinde

कोल्हापूरसह `या’ जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना लागू

Abhijeet Shinde

विरोध : बांगलादेशी मौलवीने काढला अजब फतवा!

Rohan_P

एमईच्या प्रलंबित निकालाला गती येणार  का ?

Abhijeet Shinde

फडणवीसांच्या त्यागाचा भाजपला अभिमान

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!