Tarun Bharat

Kolhapur : काम केलं की जाहिरात करण्याची गरज पडत नाही; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

Advertisements

Dhananjay Mahadik vs Satej Patil : संजय घोडवत यांच्या स्टार एअर कंपनीची कोल्हापूर – मुंबई विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी याचे उड्डाण होणार आहे. यामुळे प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून विमानसेवेचा वाद कोल्हापूर वासियांपासून लपून राहिला नाही. धनंजय महाडिक विरूध्द बंटी पाटील ( सतेज पाटील ) असा वाद सुरु आहे. विमानसेवा सुरु करण्याचा मानकरी कोण यावरून सध्या वादंग सुरु आहे. आज झालेल्या कार्यक्रमा दरम्यान यावेळी व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली. यावेळी धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच नाव न घेता निशाणा साधला. काम केलं की जाहिरात करण्याची गरज नाही असा उपरोधक टोला त्यांनी लगावला. धैर्यशील मानेंनी देखील टोला लगावण्याची संधी सोडली नाही.

नक्की वाचा >>> महाडिक कुटूंब मौजे वडगावातील जनतेच्या पाठीशी ठाम- खासदार महाडिक

यावेळी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, विमानतळाच्या कार्यक्रमाची एक जाहिरात देण्यात आली. त्यामध्ये धनंजय महाडिक वगळता जिल्ह्यातील सगळे नेते आहेत. समस्त कोल्हापूरकर या नावाने ही जाहिरात दिली आहे. मात्र, काम केलं असलं, की जाहिरात करण्याची गरज नाही नाव न घेता सतेज पाटलांच्यावर टीकास्त्र सोडले.


धैर्यशील माने म्हणाले, की संजय घोडवत यांच्या संजय नावामध्ये सतेज पाटील यांच्या नावातील ‘स’ आणि धनंजय महाडिक यांच्या नावातील ‘जय’ असा उल्लेख आहे. त्यामुळे माने यांनी दोघांच्या नावाचा धागा जोडताच धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावण्याची संधी सोडली नाही.

सतेज पाटील काय म्हणाले
कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरवातीपासूनच आपण आग्रही असून त्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न करत विमानतळाच्या विकासाला गती दिली. अनेक वर्षाच्या अविश्रांत परिश्रमामुळे विमानतळाचा विकास साध्य झाला असून प्रलंबित प्रश्नांबाबतही पाठपुरावा सुरु आहे. त्यातच विमानतळाच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत धनंजय महाडिकांना वगळण्यात आलं आहे. यावरून महाडिकांनी पाटलांवर निशाणा साधला.

अशी असेल विमानसेवा

कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असेल

मुंबईतून सकाळी 10.30 वाजता टेकऑफ तर कोल्हापुरात 11.20 वाजता लँडिंग

कोल्हापुरातून सकाळी 11.50 वाजता टेकऑफ तर मुंबईत 12.45 वाजता लँडिंग होणार

दुसरीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाग, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे

Related Stories

बिबट्या नरभक्षक नाही

Archana Banage

Kolhapur : वाबळेवाडी शाळेला करवीरमधील शिक्षकांची भेट

Abhijeet Khandekar

संभाजीनगरातील जुगार अड्ड्यावर छापा; दहा जणांवर कारवाई

Archana Banage

१७ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानंदने केले जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत

Rahul Gadkar

ऐश्वर्या ब्युटी पार्लर नाटक आता व्यवसायिक होणार

Archana Banage

पूरबाधित क्षेत्रातील 380 गावे रडारवर

Archana Banage
error: Content is protected !!