ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Dhananjay Munde car accident राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास परळीतील आझाद चौकात अपघात झाला. या अपघात मुंडे यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी आटपून परळीकडे परतत होतो. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला. यात माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.”
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहेत. आज दुपारीच त्यांना विमानाने मुंबईला हालविण्यात येणार असल्याची माहिती आहे.