Tarun Bharat

मानस फुटबॉल अकादमीतर्फे धनश्री कदमचा सत्कार

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

डेट्रॉईट, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आयोजित स्पेशल ऑलिम्पिक्स युनिफाईड चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत भारताच्या एसओ युनिफाईड फुटबॉल महिला संघाने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकाविले. या संघातील बेळगावच्या धनश्री कदमने मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल बेळगावामध्ये तिचा सत्कार करण्यात आला.

भारताचा एसओ भारत युनिफाईड महिला फुटबॉल संघ अमेरिकेतील युनिफाईड चषकासाठी पात्र ठरला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली होती. पण उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

या संघाचे प्रतिनिधीत्व करणारी बेळगावची फुटबॉलपटू धनश्री कदमचा शुक्रवारी मानस नायक फुटबॉल अकादमीतर्फे खास गौरव करण्यात आला. यावेळी मानस अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक मानस नायक, संजय पाटील, सादीक मुल्ला, महिला फुटबॉलपटू रितू पाटील, वैष्णवी पाटील, अपर्णा हरिहर, तेजश्री पाटील, लक्ष्मी कांबळे यांच्या हस्ते धनश्री कदमचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी धनश्रीचे वडिल सदानंद कदम व आई आशा कदम उपस्थित होते. पुढील काळात होणाऱया फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धनश्री म्हणाली.
ने याप्रसंगी सांगितले.

Related Stories

शिंदोळी येथील शिक्षण संस्थेला 90 हजारांचा गंडा

Amit Kulkarni

बाजारात रानमेवा दाखल

Amit Kulkarni

पावसाने उघडीप दिली तरच पिकांना जीवदान

Patil_p

कंग्राळी खुर्द येथे बलिदान मासला प्रारंभ

Amit Kulkarni

ग्रामपंचायत ग्रंथपालांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Patil_p

जुगारी अड्डय़ावर छापा; 11 जणांना अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!