शेकडोंची उपस्थिती, वंशजांचा झाला सत्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडला. शेकडोंच्या उपस्थितीत बेळगावच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपतींच्या काळात स्वाभिमानाने लढलेल्या वंशजांचा सत्कार करण्यात आला.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके प्रास्ताविकात म्हणाले, संभाजी महाराजांचे स्मारक शिव व शंभू भक्तांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. बेळगावमध्ये अनेक शिवप्रेमी युवक असून, त्यांच्या सहकार्यातून हे स्मारक उभे राहू शकल्याचे त्यांनी सांगितले. इतिहासकार, लेखक, पेंद्र सरकारचे माहिती आयुक्त उदय माहुरकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.
बहिर्जी नाईक यांचे वंशज दादाराम जाधव, धाराऊंचे वंशज अमित गाडे, हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराजे मोहिते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे येथील शिवकन्या श्रद्धा शिंदे यांची उपस्थिती होती. दिमाखदार पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.