Tarun Bharat

Photo : कोल्हापुरात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन, एकदा नक्की पहा

खोल खंडोबा तालीम मंडळ आणि शिवगर्जना तरुण मंडळ यांच्या वतीने कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्यांच्या विविध क्षणावर रांगोळी साकारली आहे. त्यात बारा स्पर्धकांनी भाग घेतला.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत अनेक किस्से या रांगोळाच्या माध्यमातून साकारण्यात आले. यामध्ये देवीची पूजा करताना मग्न झालेले आनंद दिघे यांची आठवण.
धर्मवीर आनंद दिघे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात संवाद होतानाचे क्षणचित्र रांगोळीतून उमटवले.
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे हे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्रित उपस्थित असलेले छायाचित्र. ज्यामध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार दिघे करत आहेत.
धर्मवीर आनंद दिघे हे महादेव भक्त होते. शिवलिंगावर अभिषेक करतानाचे दिघे.
स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांना नाम ओढताना.
एका रांगोळीत आनंद दिघे यांच्या दोन प्रतिमा दिसत आहेत. एका रांगोळीत हातात बॅट घेऊन खेळाडू झालेले दिघे तर दुसऱ्या फोटोत शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती समोर अभिमानाची मुद्रा दर्शवणारे दिघे यांची रांगोळी.
भाऊबीजे दिवशी त्यांच्या बहिणीकडून औक्षण करताना दिघे.
पहिल्या रांगोळीत ध्यान करतानाची आनंद दिघेंची मुद्रा तर दुसऱ्या रांगोळीत ठाण्यातील प्रथम दहिहंडी फोडलेला साहस जिद्द बाल गोविंदासोबत आनंद दिघे.
आनंद दिघे यांची हास्यमुद्रा असलेली रांगोळी.

Related Stories

अन् अणुस्कुरा घाटाची पायवाट दिसु लागली

Archana Banage

सांगली शहरात बिबट्या आल्याच्या चर्चेने खळबळ

Archana Banage

दुचाकीच्या भीषण धडकेत तीन ठार; दोन गंभीर

Kalyani Amanagi

टोकियोमध्ये आणीबाणी लागू; प्रेक्षकांच्या अनुपस्थित होणार ऑलिम्पिक स्पर्धा

Archana Banage

आंध्र प्रदेशात 10 जूनपर्यंत वाढविला कोरोना कर्फ्यू

Tousif Mujawar

कोल्हापुरच्या व्यावसायिकाला पुणेरी भामट्याने गंडवले

datta jadhav