Tarun Bharat

माशेल येथे हेल्थमेट होमिओपॅथीतर्फे मधुमेह तपासणी शिबिर उत्साहात

वार्ताहर /माशेल

फोंडा येथील डॉ. कौतुक भाटीकर यांच्या हेल्थमेट होमिओपॅथी व एडलवाईस टोकियो लाईफ यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह तपासणी शिबिर आयेजित करण्यात आले.

  माशेल येथील वक्रतुंड इमारतीच्या दुसऱया मजल्यावर हे शिबिर घेण्यात आले. 41 जणांनी यावेळी आपल्या रक्ताची तपासणी केली. यातील 16 रूग्ण मधुमेही सापडले. या रूग्णांना मोफत औषध वितरीत करण्यात आली. एडवन इंटरनॅशनल यांनी ही औषधे पुरस्कृत केली होती. शिबिराच्या उद्घाटन सोहळय़ाला डॉ. कौतुक भाटीकर एडलवाईस टोकीयो लाईफच्या अधिकारी दीपावली जोशी नाईक, किर्तीकुमार भाटीकर, पराग नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. कौतुक भाटीकर यांनी शिबिर आयोजन करण्यासाठी सहकार्य केलेल्या एडलवाईस व उपस्थित रूग्णांचे आभार मानले.

Related Stories

बिटस् पिलानी कॅम्पसमध्ये 30 विद्यार्थी कोविड बाधीत संस्था पुन्हा ऑनलाईन वर्गांकडे

Amit Kulkarni

राजीव कला मंदिरच्या अ. गोवा महिला संगीत नाटय़स्पर्धेचे उद्घाटन

Omkar B

फाळकेंनी भारतीय चित्रपटक्षेत्रात आत्मनिर्भरता आणली

Amit Kulkarni

मंत्री मिलिंद नाईक यांना हटवून एफआयआर नोंदवा

Patil_p

गोवा माईल्स, ऍप टॅक्सी परवानगी त्वरीत रद्द करा

Patil_p

राज्यात जोरदार पाऊस

Amit Kulkarni