Tarun Bharat

मधुमेहामुळे भात खाण्यास मनाई आहे? ‘हा’ तांदुळ टेस्ट करा

Advertisements

Black Rice Benefits: भारतीय लोकांच्या आहारात नियमित जेवणात भात हा असतोच. भात खायला आवडत नाही अशी क्वचितच व्यक्ती असेल. अनेकांना ताटात भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्याचा फिल येत नाही. मात्र मधुमेह रूग्णांना भात जेवणातून बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला जातो. भातप्रेमी असणारे मधुमेही रूग्ण मात्र यापासून वंचित राहतात. यालाही एक पर्याय आहे. तो म्हणजे काळा तांदुळ.काळ्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँथोसायनिन असतात.काळ्या तांदळामध्ये सापडलेला अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित करतो.100 ग्रॅम काळ्या तांदळामध्ये साधारणतः 4.5 ग्रॅम फायबर असते जे आपले पचन अधिक चांगले राखण्यास मदत करते.

ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल: डायबिटीज असलेल्या लोकांसाठी काळा तांदूळ खूप फायदेशीर आहे.काळ्या तांदळात जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे मधुमेही रुग्णांना फायदा होतो. एवढेच नाही तर तांदळाचे इतरही फायदे आहेत. काळ्या तांदळात अँटी-ऑक्सिडंट प्रथिने असतात. याशिवाय, काळ्या तांदळात अँटी-इंफ्लेमेटरी आणि ऑक्सिडेंट गुणधर्म देखील असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त: मधुमेहाच्या रुग्णांसाठी वजन वाढणे ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना पांढरा भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी काळा भात खाल्ल्याने चवही टिकून राहते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

ग्लूटेन मुक्त: मधुमेहाच्या रुग्णांना ग्लूटेन टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी काळा भात खाणे फायदेशीर ठरते कारण काळा तांदुळ ग्लूटेन फ्री असतो.

हृदयविकारात फायदेशीर : यासोबतच काळा तांदूळ हृदयरोग आणि त्याचा धोका कमी करण्यास मदत करतो. हे डोळ्यांसाठीही चांगले असते. यामध्ये भरपूर फायबर असते. म्हणूनच ते शरीरात चरबी वाढू देत नाही आणि लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते.

Disclaimer: वरील दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

Related Stories

मक्यामुळे प्रोटीनचा पुरवठा

Amit Kulkarni

चिमुरडय़ा ओजससाठी तातडीच्या मदतीचे आवाहन

NIKHIL_N

जपावे दंत आरोग्य

Omkar B

जेवल्यानंतर सतत जळजळ होतेय, हे उपाय ट्राय करा

Archana Banage

जपानी वॉटर थेरपी

tarunbharat

किडनी विकार आणि कोरोना

Omkar B
error: Content is protected !!