पालिका मंडळ अंधारात : नगराध्यांनी ठोकली कुलूपे. यामागील सूत्रधार दलाल कोण ? सदर तात्पुरते पत्र्यांचे गाळे पाडण्याची मागणी.
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली बाजारातील 24 गाळय़ांसाठी तात्पुरत्या तत्वावर उभारण्यात आलेल्या पत्र्यांचे खाली गाळे कुणीतरी अज्ञात दलालाने बेकायदेशीरपण परस्पर भाडेपट्टीवर दिल्याचा प्रकार गुरुवार दि. 15 सप्टेंबर रोजी उघडकीस आला. कचरा सफाई कामगारांनी कचरा न उचलल्याने नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि इतर नगरसेवकांनी स्वतः बाजारात उपस्थिती लावून कामगारांकडून उचलून घेताना हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार पाहून नगराध्यक्षांसह नगरसेवकही चक्रावून गेले. आणि नगराध्यक्षांनी थेट सर्व गाळय़ांना कुलूपे ठोकली.
डिचोली बाजारात नव्याने उभारलेल्या मार्केट प्रकल्प इमारतीच्या बांधकामावेळी याठिकाणी असलेल्या 24 पुनर्वसित गाळेधारकांचे स्थलांतर नगरपालिकेने मासळी मार्केटच्या समोर उजव्या बाजूने कुंपणाला लागून पत्र्याचे तात्पुरते गाळे उभारले होते. सदर गाळे पूर्णपणे तात्पुरते होते. व त्यातील गाळेधारकांना नवीन मार्केट प्रकल्प इमारतीत स्थलांतर केल्यानंतर ते हटविण्याची तरतूद करूनच ते उभारण्यात आले होते.
नवीन मार्केट प्रकल्पाचे उदघाटन होऊन आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. उद्घाटनानंतर लगेच तात्पुरत्या गाळय़ांमधील गाळेधारकांना नवीन प्रकल्प इमारतीत गाळे देण्यात आले व त्यातील बहुतेक गाळेधारक स्थलांतरीतही झाले. केवळ 24 पैकी 6 गाळय़ांच्या तांत्रिक बाबींमुळे ते स्थलांतर व्हायचे राहिले आहेत. त्यामुळे सध्या स्थलांतर होऊन पत्र्याचे गाळे सोडलेल्या गाळेधारकांचे गाळे बंदच आहेत.
बंद गाळय़ांचा गोदामांसाठी खुलेआम वापर
बंद असलेल्या सदर पत्र्यांच्या गाळय़ांचा काही भाजी विपेत्यांकडून थेट गोदाम म्हणून वापर केला जात आहे. या गाळय़ांमध्ये दर बुधवारी आठवडा बाजाराला येणाऱया भाजी विपेत्यांनी आपले दुकानाचे सामान, भाजीचे बॉक्स तर काही गाळय़ांमध्ये थेट भाजीचासाठा करून ठेवण्यासाठी वापरात आणले आहे.
पालिका मंडळ, नगराध्यक्ष अंधारात
या पत्र्यांच्या गाळय़ांचा सर्रासपणे गोदामांसाठी वापर होत असल्याची माहिती डिचोली नगरपालिकेतील कोणालाच माहिती नव्हती. हा प्रकार कधीपासून सुरू आहे आहे याबाबतही सर्वचजण अंधारात होते. मात्र डिचोली बाजार प्रकल्प 2012 मध्ये दुकानदारांना बाब माहीत होती. याबाबत कोणी अधिकृत किंवा जबाबदार व्यक्तींकडे वाच्यता केली नाही. या प्रकाराबाबत डिचोली नगराध्यक्ष तसेच पालिका मंडळातील इतर नगरसेवक अंधारातच होते.
कचऱयाची साफसफाईवेळी प्रकार उघड
बुधवारचा आठवडा बाजार झाल्यानंतर त्याच रात्री कचरा साफ न करता तो तसाच दुसऱया दिवसापर्यंत कचरा उचलण्यात आला नव्हता. हा प्रकार लक्षात येताच नगराध्यक्ष कुंदन फळारी व इतर नगरसेवकांनी दखल घेऊन पालिका कामगारांकडून कचरा साफ केला. यावेळी तेथे जमलेल्या दुकानदार, विपेत्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या लक्षात सदर बाब आणून दिली. दुकाने उघडून आंतमध्ये ठेवलेले सामान दाखवून दिले.
सदर खाली गाळय़ांची शटरे उघडून पाहताच नगराध्यक्ष कुंदन फळारी चक्रावले. त्यांनी सर्व गाळे उघडून पाहिले आणि तत्काळ पालिका अभियंता, कनि÷ अभियंता, बाजार निरीक्षकांना बाजारात पाचारण केले. या गाळय़ांमध्ये सामान कोणी व कोणाच्या परवानगीने ठेवले ? यामागील सूत्रधार कोण ? याचे कोणी भाडे घेत आहे का ? असे प्रश्नांची सरबत्ती नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी या अधिकाऱयांना केली. परंतु, याबाबत सर्व अधिकाऱयांनी अनभिज्ञता व्यक्त केली. यानंतर नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी सामान असलेल्या सर्व गाळय़ांना कुलूपे ठोकली. यावेळी नगरसेवक सुदन गोवेकर, माजी नगरसेवक कमलाकर तेली हेही उपस्थित होते.
याचा मुख्य दलाल कोण ?
डिचोली बाजारातील नगरपालिकेच्या अधिकारातील खाली पत्र्यांचे गाळे भाजीवाल्यांनी कोणाच्या परवानगीने गोदाम म्हणून वापरास घेतले? हा विषय अद्यापही गुलदस्त्यात आहे. पालिकेची जागा कोणीही कोणाच्याही हरकतीशिवाय वापरूच शकत नाही. तर या आठवडा बाजाराला येणाऱया भाजीवाले विपेत्यांना सदर गाळे गोदाम म्हणून वापरायला दिले तरी कोणी? यात नगरपालिकेतील कोणी सामील आहे का? असे उलटसुलट प्रश्न सध्या पालिका मंडळाच्या आहेत. याची उत्तरे शोधण्याचे आव्हानही नगरपालिकेसमोर आहे.
ते गाळे त्वरित जमीनदोस्त करावे
सदर पत्र्यांचे गाळे तात्पुरते उभारले होते. आता त्यातील जास्तीत जास्त गाळेधारक नवीन इमारतीत स्तलांतर झाले आहे. त्यामुळे ते जमीनदोस्त करण्याचा ठराव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी पालिका मुख्याधिकाऱयांनी तत्काळ करावी. या गाळय़ांमध्ये गैरकृत्ये होऊन पालिकेची प्रतिमा बदनाम होण्यापूर्वी मुख्याधिकाऱयांनी हे गाळे हटवावे. अशी मागणी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी आहे.