Tarun Bharat

“नवा सोमवार” उत्सवासाठी डिचोलीवासीय सज्ज

सर्वत्र तयारी अंतिम टप्प्यात. घरांवर व मंदिरांवर आकर्षक विद्यूत रोषणाई. नामवंत गायकांच्या संगीत मैफली. 

डिचोली/प्रतिनिधी

डिचोलीतील देवी श्री शांतादुर्गेचा प्रसिद्ध “नवा सोमवार” उत्सव गावकरवाडा डिचोली आणि आतीलपेठ डिचोली येथे आज सोम. दि. 28 नोव्हें. रोजी साजरा करण्यात येणार आहे. दोन वर्षे मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आल्यानंतर यावषी या उत्सवाचा थाट मोठा असणार. त्यासाठी डिचोलीत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या पावसानंतर बंद झालेली पालखी मिरवणूक पुन्हा सुरू होणार असल्याने पालखीतून देवीच्या स्वागतास डिचोली नगरीतील भाविक सज्ज होत आहे. सर्वत्र आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली असून रस्त्यांच्या बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. 

गावकरवाडा डिचोली येथील देवी श्री शांतादुर्गेच्या मंदिरात ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे आज दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री देवीची पालखी बाहेर निघणार. तर आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात यावषी गुरूफंड ट्रस्ट व भायलीपेठ दहाजण नवा सोमवार उत्सव समातीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मठमंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी व इतर कार्यक्रम होणार. रात्री पालखी भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडणार.

गावकरवाडा येथील उत्सव

डिचोली येथील ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे श्री शांतादुर्गा  देवीचा नवा सोमवार उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक तसेच गायनाच्या मैफली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी. दुपारी आरती व तिर्थप्रसाद, रात्री 9 वा. सर्व भक्तजनांच्या उपस्थितीत देवीला गाराणे घालून मोठय़ा जयघोषात दत्तप्रसाद भजनी मंडळ दि?डी पथक, उभादांडा वेंगुर्ला तसेच हनुमान बेन्ड बाणास्तरी यांच्या संगतीने पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे.

गावकरवाडा येथे गायनाच्या मैफली

पहिली मैफल रात्री 10 वा. गावकरवाडा येथील देवीच्या प्रांगणात होणार आहे. अरूण दाते प्रस्तुत “भक्ती भावधारा” कार्यक्रम होणार. त्यात प्रसिध्द गायक कलाकार नचिकेत देसाई (मुंबई), गायिका पल्लवी पारगांवकर (मुंबई), वर्षा जोशी (मुंबई) या संगीत सादर करणार आहेत. तर या मेफलीचे निवेदन संगीता जोशी करणार आहेत. तर रात्री 1.30 वा. श्री देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात “अभंगगायन” हि दुसरी मैफल होणार आहे. त्यात सुप्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी (मुंबई), वैदेही मळीक (मुंबई) यांचे गायन सादर होणार. तर नेहा उपाध्ये (मुंबई) या निवेदन करणार आहे. 

आतीलपेठ येथील उत्सव

आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात गुरूफंड ट्रस्ट व भायलीपेठ दहाजण नवा सोमवार उत्सव समातीतर्फे हा उत्सव साजरा होणार असून मठमंदिरातील सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. मठमंदिरात सकाळी धार्मिक विधी त्यानंतर सकाळी 9 ते रात्री पालखी मंदिरात येईपर्यंत ओटी फुले नारळ आदी साहित्य स्वीकारण्यात येईल.

श्री देवी शांतदुर्गेची पालखी रात्री 8 वा. देवीची पालखी मठमंदिरातून बाहेर निघेल व श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ भाविकांसाठी रात्री 10 पर्यंत ठेवली जाणार. तेथे या दरम्यान भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वा. बँड पथकासह पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार. पालखी आतीलपेठ, सोनारपेठ, भायलीपेठ व बोर्डे वडाकडे पर्यंत जाऊन माघारी फिरणार. भायलीपेठ, सुंदरपेठ मार्गे आतीलपेठ येथील मठमंदिरात मंगळवारी दुपारी विधीवतपणे दाखल झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे. 

गायनाच्या संगीत मैफली

आतीलपेठ येथील या उत्सवातील पहिली संगीत मैफल आतीलपेठ मठमंदिरात होणार आहे. त्यात प्रसिध्द गायक ईश्वर घोरपडे (पुणे), सौ. स्वरांगी मराठे काळे (मुंबई) हे गायन सादर करणार. तर त्यांना संवादिनीवर राया कोरगावकर, तबल्यावर दयानिधेश कोसंबे, पखवाजवर दत्तराज शेटय़?, साईड रिदम राहुल खांडोळकर हे साथसंगत करणार आहेत. तर या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन गोविंद भगत हे करणार आहे. या उत्सवातील दुसरी संगीत मैफल रात्री 11.30 वा. भायलीपेठ येथील गुरूफंड ट्रस्टच्या सभागृहात होणार आहे. त्यात गोमंतकीय गायक कलाकार नहुश लोटलीकर, सौ. दिप्ती गावस, अर्चना कामुलकर हे गायन सादर करणार आहे. त्यांना संवादिनीवर प्रसाद गावस, तबल्यावर बुध्देश तळकर, पखवाजवर किशोर तेली व मंजिरीवर महेंद्र च्यारी हे साथसंगत करणार आहेत. 

या उत्सवासाठी डिचोलीत सर्वत्र तयारी अंतिम टप्प्यात असून रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. गेली दोन वर्षे कोवीडच्या धास्तीमुळे हा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. फेरीवाल्यांनी मर्यादित स्वरूपात दुकाने थाटली होती. यावषी मात्र कोवीडचे संकट टळल्याने उत्सव मोठय़ा उत्साहाने व थाटामाटात साजरा करण्यात येणार असल्याने डिचोलीत उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. 

Related Stories

रुग्णवाहिका कर्मचाऱयांना मारहाणप्रकरणी पर्यटक अटक

Amit Kulkarni

मडगावातील डॉ. मारियो गुदिन्हो यांचे निधन

Patil_p

कुळे – शिगाव भागात अग्रशाळा, स्मशानभूमिचे उद्घाटन

Amit Kulkarni

दुबई कराटे अजिंक्यपद स्पर्धेत श्रृती देवारीला सुवर्ण

Amit Kulkarni

फातोडर्य़ात आज एटीकेएमबीची लढत केरळ ब्लास्टर्सशी

Patil_p

पोरस्कडे येथे बेकायदा रेती व्यवसायावर पेडणे पोलिसांची धडक कारवाई

Omkar B