क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या डिचोली तालुका सुब्रोतो मुखर्जी 17 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मयेच्या पैरा हायस्कूलने मिळविले. साखळीत सेसा गोवा फुटबॉल अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन झाले. अंतिम लढती होली क्रॉस हायस्कूलचा पैरा हायस्कूलने 4-0 गोलानी पराभव केला. विजेत्या पैरा हायस्कूलसाठी साईशा घाटवळने दोन तर त्रिशा हळदणकर व रुषोला गवंडरने प्रत्येकी एक गोल केला.