Tarun Bharat

डिचोलीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक 1 जुलै रोजी

Advertisements

नगरसेविका सुखदा तेली यांचे नाव निश्चित : आठ जणांचा गट एकसंध

प्रतिनिधी /डिचोली

  अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच डिचोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष तनुजा सतीश गावकर यांचा राजीनामा पालिका संचालनालयात स्वीकारण्यात आल्यानंतर या नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवार दि. 1 जुलै रोजी सकाळी डिचोली नगरपालिका कार्यालयात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, नवीन राजकीय घडामोडीत स्थापन झालेल्या आठ जणांच्या गटातील नगरसेविका सुखदा तेली यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाले आहे.

   डिचोली नगरपालिकेतील भाजप समर्थक नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, नीलेश टोपले अनिकेत चणेकर, दीपा पळ, सुदन गोवेकर यांच्यासह मगो पक्षाचे म्हणजेच माजी आमदार नरेश सावळ गटाच्या नगरसेविका सुखदा तेली व ऍड. रंजना वायंगणकर या आठ जणांच्या गटाने उपनगराध्यक्षा तनुजा गावकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. परंतु त्याच दिवशी उपनगराध्यक्षा तनुजा गावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. सदर राजीनामा मागे घेण्याच्या मुदतीत मागे न घेतल्याने अखेर ते स्वीकारण्यात आला.

  डिचोली नगरपालिकेकडे भाजपचेच दहा नगरसेवक होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत डिचोली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांच्या विरोधात या दहा पैकी चार नगरसेवकांनी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने सदर चारही नगरसेवकांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्वात प्रथम उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. परंतु याची कुणकुण लागताच त्यांनीच स्वतः हे पद राजीनामा देऊन सोडल्याने सत्ताधारी गटाची वाट मोकळी झाली आहे.

   चार नगरसेवकांना सत्तेबाहेर ठेवल्याने भाजपकडे सहा नगरसेवक राहिले होते. पालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला आठ नगरसेवकांचा आकडा गाठण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी माजी आमदार नरेश सावळ यांच्या गटातील नगरसेविका सुखदा तेली व ऍड. रंजना वायंगणकर यांना बरोबर घेतले आहे. या राजकारणा विरोधात विरोधी गटातील काही नगरसेवकांनीही आपल्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु त्या अद्याप तरी सफल होऊ शकलेल्या नाही.

   या सत्ताधारी आठ जणांच्या गटातर्फे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदावर सर्वप्रथम नगरसेविका सुखदा तेली यांना बसविण्याचे निश्चित झाले आहे. तर नंतरच्या काळात सामंजस्य करारानुसार इतरांनाही संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सत्ताधारी आठ जणांचा गट हा एकसंध असल्याचे या गटातील नगरसेवकांनी सांगितले.

Related Stories

शशिकला गोवेकर यांचा ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्याहस्ते सत्कार

Amit Kulkarni

आपच्या सात उमेदवारांचे अर्ज दाखल

Amit Kulkarni

आमदार पात्रता आव्हान याचिकेला मिळेना मुहूर्त!

Amit Kulkarni

विदेशात अडकलेल्या गोमंतकीयांना ‘वंदे भारत’च्या अंतर्गत परत आणा

Patil_p

अमर नाईक खून प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराचा छडा लावण्यास पोलिसांना यश

Amit Kulkarni

गोव्याने मिळविलेले यश जगासाठी प्रेरणादायी

Patil_p
error: Content is protected !!