Tarun Bharat

नितीशकुमार-तेजस्वी यादव यांच्यात पुन्हा मतभेद

पाटणा / वृत्तसंस्था

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात पुन्हा मतभेदांची दरी दिसून आली आहे. माजी कृषीमंत्री आणि राजदचे नेते सुधाकर सिंग यांनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने दोन्ही पक्षांमधील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.

नितीशकुमार यांचा संजद आणि मुख्यमंत्र्यांना जवळ असणारा पक्ष हिंदुस्थानी आवाम पार्टी या दोन्ही पक्षांनी सुधाकर सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडे केली आहे. कुमार यांच्या धोरणांवर टीका केल्याने सुधाकर सिंग यांना कृषीमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तरीही त्यांनी कुमार यांचा पाणउतारा करणे सुरुच ठेवले आहे. 2022 या वर्षाच्या अखेरीस एका टीव्ही कार्यक्रमा भाग घेताना सिंग यांनी नितीशकुमार सरकारवर आरोप केले होते. हे सरकार अल्पकाळ टिकणार आहे. कुमार यांनी तत्काळ तेजस्वी यादव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे संजद संतापला असून सिंग यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी. शक्य तर त्यांना राजदमधून काढून टाकावे अशी मागणी संजदच्या काही आमदारांनी केली आहे. नितीशकुमार यांना अद्याप स्वपक्षाच्याच या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तेजस्वी यादव यांनीही त्यांचे मत व्यक्त केलेले नाही. मात्र, सुधाकर सिंग  हे तेजस्वी यादव यांच्या जवळचे असल्याने ते त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी सुधाकर सिंग यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली होती. कुमार यांनी सुधाकरसिंग यांना दोष दिला होता.  तसेच भर बैठकीत त्यांची कानउघाडणी केली होती. तो राग राजद अद्याप विसरलेला नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सारेच सुरळीत नाही, असे  दिसत आहे.

Related Stories

टेलिकॉम, वाहन क्षेत्र गतिमान

Patil_p

ड्रग्जसाठी मला रियाचे फोन, मेसेज !

Patil_p

बजेट 2021 : 75 वर्षावरील नागरिकांना आयटी रिटर्न्सपासून मुक्ती

datta jadhav

जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात होणार दुरुस्ती

Amit Kulkarni

चोवीस तासात ‘कोरोना’मुळे 26,382 बाधित, 387 मृत्यू

Omkar B

‘भारत बंद’ला वाढता पाठिंबा

Patil_p