Digestion Tips: कोरोनानंतर आहार काय घ्यावा आणि कसा घ्यावा याबबात अनेक माहिती पाहिली, वाचली आणि नियमित त्यासंदर्भात माहिती वाचतो. यानंतर आहारामध्ये डायटचा समावेश केला जातो. मात्र नियमित तोच तो आहार घेतल्यानंतर काही काळाने कंटाळा यायला लागतो. अशावेळी तळलेले, फास्ट फूडवर ताव मारला जातो. यामुळे पचनाच्या समस्या वाढतात. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्य़ांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत याविषयी जाणून घेऊया.
तळलेले पदार्थ
तळलेले अन्न हे पचायला सर्वात कठीण अन्न असते. या अन्नामुळे अतिसार, सूज किंवा बद्धकोष्ठता होऊ शकतात. तसेच छातीत जळजळ आणि ऍसिडीटी होऊ शकते. त्यामुळे शक्य तितके पदार्थ खाणे टाळावेत.
प्रक्रिया केलेले अन्न
चिप्स, ब्रेड आणि सोडा यांसारख्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात ज्याचा
पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे काही वेळएला पोट फुगवणे आणि गॅस होणे अशा समस्या उध्दवू शकतात. जे लोक भरपूर प्रक्रिया केलेले आणि पॅक केलेले पदार्थ खातात त्यांना पाचन तंत्राच्या दीर्घकालीन समस्या येऊ शकतात.
मिरची
मिरच्या पचायला खूप जड असतात. मिरची खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात शक्यतो मिरची खाणे टाळा. लाल मिरच्यांऐवजी हिरव्या मिरच्या खाण्यास प्राधान्य द्या.
चॉकलेट
चॉकलेटमुळे छातीत जळजळ होते. याशिवाय पोट खराब होऊ शकते. विशेषत: जेव्हा तुम्ही एखाद्या विकाराने ग्रस्त असाल तर चॉकलेट खाण्यास टाळा. कारण ते पचण्यास जड असते. त्यामुळे काही लोकांमध्ये लूज मोशन आणि अतिसार देखील होऊ शकतो.
कॉफी
कॅफिन पाचन तंत्रासाठी खूप वाईट आहे. कॉफी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टची गतिशीलता वाढवते आणि अतिसार, बद्धकोष्ठता आणि पोषण पातळी कमी करते. त्यामुळे पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते.


previous post