Tarun Bharat

भारत सरकारचा डिजिटल स्ट्राईक

348 मोबाईल ऍप्सवर बंदी ः सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

मोबाईल गेमिंग ऍप्सनंतर आता केंद्र सरकारने जवळपास साडेतीनशे मोबाईल ऍप्स ब्लॉक केले आहेत. एका अहवालानुसार, भारत सरकारने चीनसह जगातील विविध देशांमध्ये बनविलेले 348 मोबाईल ऍप्स ओळखून ब्लॉक केले आहेत. ही ऍप्स चीनसह विविध देशांनी विकसित केलेली आहेत. सदर ऍपच्या माध्यमातून नागरिकांचे प्रोफाईल करण्यासाठी वापरकर्त्याचे तपशील गोळा केले असून ते अनधिकृतपणे परदेशात प्रसारित केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे.

348 मोबाईल ऍप्लिकेशन्स भारतातील वापरकर्त्यांची माहिती गोळा करून ती अनधिकृतपणे प्रोफाईलिंगसाठी देशाबाहेरील सर्व्हरवर पाठवत होते, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. देशाबाहेर होत असलेली डाटाचोरी भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे तसेच भारताच्या संरक्षणाचे आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. बंदी घालण्यात आलेल्या ऍप्समध्ये केवळ चीनच नव्हे तर अन्य देशांचाही समावेश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये डेटा सुरक्षेच्या कारणास्तव चीनच्या 117 ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर चालू वर्षाच्या प्रारंभी सुरक्षेच्या कारणास्तव माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए अंतर्गत 14 फेब्रुवारी रोजी बॅटल रॉयल गेम फ्री फायरसह 53 अन्य चीनशी संबंधित ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती.

Related Stories

वायव्य भारत, उत्तरेत थंडीची लाट

datta jadhav

संसदेच्या कँटिनमधील मांसाहार बंद?

Patil_p

कर्नाटकात कोरोनाबाधितांची संख्या शतक पार

Patil_p

नव्या पीएमओचा मार्ग मोकळा

Patil_p

योगी मंत्रिमंडळाचा सप्टेंबरमध्ये विस्तार

Patil_p

चक्रीवादळांचा आधीच शोध घेणारे तंत्रज्ञान

Patil_p