Tarun Bharat

भारताच्या दीक्षा डागरला मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ब्राझीलच्या कॅसियस दो सूल शहरात सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक (Deaflympics) स्पर्धेत भारताची गोल्फर दीक्षा डागरने अमेरिकेच्या ऍशलिन ग्रेस जॉन्सनचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. (Diksha Dagar Goldmedal in Deaflympics) दीक्षाचे मूकबधीर ऑलिम्पिकमधील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्याने रौप्यपदक जिंकले होते. या खेळामध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे.

लहानपणापासून खेळाची आवड असणाऱ्या दीक्षाने आजवर खेळात उत्तम कामगिरी केली आहे. 2017 च्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये गोल्फचा पहिल्यांदा समावेश झाला तेव्हा दीक्षाने सहज अंतिम फेरीत प्रवेश केला. पण अमेरिकेच्या योस्ट केलीयनने तिला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दीक्षा गेल्या वषी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती आणि तिने लेडीज युरोपियन टूरवर वैयक्तिक विजेतेपद जिंकले आहे. लेडीज युरोपियन टूरवरील सांघिक स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचाही ती एक भाग राहिली आहे. दरम्यान, फ्रान्सच्या मार्गो ब्रेझोने अतिशय चुरशीच्या सामन्यात 2017 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

error: Content is protected !!