वार्ताहर/ देवगड-
कोरोना काळापासून नाट्यरसिक प्रत्यक्ष नाटय़गृहात जाऊन नाटक पाहणे व नाटय़कलाकृतीचा आस्वाद घेणे यापासून वंचित राहिले आहेत. उत्तमरीत्या सुरु असलेली नाटकं कोरोना काळात व्यावसायिक गणितं अथवा काहि अन्य कारणांमुळे बंद पडली आहेत. मात्र याहि परिस्थितीत ध्येयाने झपाटून व रंगभूमीची प्रामाणिक सेवा करण्याच्या उद्देशाने मँगो सिटी देवगड येथील युवा कलाकार अभिषेक कोयंडे याने पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक अक्षय श्रीनिवास जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेले दोन अंकी नाटक दिल तो बच्चा है जी’ हे रसिकांच्या सेवेत केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने आणण्याचे ठरविले आहे. या नाटय़ उभारणीचा शभारंभ टिळक स्मारक देवगड येथे करण्यात आला.
याप्रसंगी नाट्यदिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार ऍड. अजित गोगटे,सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अŸड. प्रकाश बोडस, प्रमोद नलावडे, विनायक ठाकुर, संजीव देसाई, सचिन जाधव, सौ. मनस्वी घारे, डी. बी. कोयंडे इ. उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी व देवगड येथील `स्वरगंध’ या संस्थेने दिग्दर्शक, कलाकार व सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.