ऑनलाईन टीम / मुंबई :
मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. हे भोंगे हटविण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडूनही हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackreay) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांच्यासह काही अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर राज्यात येत्या दोन-तीन दिवसात लाऊडस्पीकरसाठी गाईडलाईन्स (Loudspeaker Guidelines) येतील, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
वळसे-पाटील म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भात राज्य सरकार नव्या गाईडलाईन्स आणण्याच्या तयारीत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त मिळून या गाईडलाईन्स तयार करणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसात या गाईडलान्स जाहीर होतील. आम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहोत. राज्याची शांतता भंग करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.