Tarun Bharat

मडगावच्या दिंडी महोत्सवाला आजपासून प्रारंभ

प्रतिनिधी /मडगांव

मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानच्या 113व्या दिंडी महोत्सवाला आज मंगळवार दि. 1 रोजी पासून प्रारंभ होत आहे. या दिंडी महोत्सवाचे उद्घाटन सायंकाळी 6.30 वाजता वेद मंत्राच्या जयघोषात समई प्रज्वलनाने होणार आहे. या प्रसंगी मडगावचे उद्योगपती प्रवास नायक व मडगावचे दिगंबर कामत तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  तत्पूर्वी मंदिरात संध्याकाळी 5.00 राम रक्षा मंडळ, मडगावच्या साधका तर्फे सुहास भट यांच्या नेतृत्वाखाली राम रक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राम रक्षा व उद्घाटन कार्यक्रमाला भक्तांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती देवस्थान समितीने केली आहे. दिंडी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ानंतर सांयकाळी 7 वा, ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांचे कीर्तन होईल. 1 ते 5 रोजी पर्यंत दररोज संध्याकाळी ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांची कीर्तने होतील तसेच इतर धार्मिक विधी.

दिंडी मुख्य उत्सव रविवार दि. 6 रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी 7 वा. श्रींस महाअभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम. नंतर सुरेंद्र शेणवी बोरकर व साथी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम. दुपारी 12 वा. महाआरती व तद्नंतर महाप्रसाद (अन्नसंतर्पण). संध्याकाळी 5 वा. वारकरी संप्रदाय तर्फे भजनाचा कार्यक्रम. सांयकाळी 6.15 वा. श्री माऊलीची धार्मिक ग्रंथासह श्रींच्या रथात स्थापना. तद्नंतर 6.30 वा. श्री हरिमंदिरा समोरील व्यासपीठावर ‘पहिली गायनी बैठक’ होईल. या बैठकीत प्राजक्ता काकतकर व अभिजीत काळे यांचे गायन होईल. नंतर न्यू मार्केट परिसरात दुसरी तर तिसरी बैठक मडगाव नगरपालिकेसमोर होणार आहे.

दिंडी महोत्सवाची सांगता सोमवार दि. 7 रोजी होईल. या दिवशी ‘गोपाळकाला’ होईल व नंतर महाआरती. रात्री 8 वा. सुप्रसिद्ध गायिका सौ. सूजाता गुरव (धारवाड) यांच्या गायनाची बैठक होईल.

Related Stories

गोवा डेअरीचे ‘फ्लेवरड् मिल्क’ फुकटात देणे बंद

Patil_p

वेळगे सत्तरी येथे 13 फुट लांबीचा किंग कोब्रा पकडला.

Patil_p

महिला कल्याण हा राष्ट्राच्या उत्थानाचा पाया

Patil_p

पंचायतींच्या निवडणुका जून महिन्यात : गुदिन्हो

Amit Kulkarni

गोव्याला अर्थसहायही मिळणार

Omkar B

म्हापशात ‘स्वर-वंदन’ कार्यक्रम

Amit Kulkarni