Tarun Bharat

मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानचा दिंडी महोत्सव 6 नोव्हेंबर रोजी

प्रतिनिधी /मडगाव

मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानचा 113वा दिंडी महोत्सवाला मंळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत असून त्याची सांगता सोमवार दि. 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्य दिंडी उत्सव रविवार दि. 6 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्राजक्ता काकतकर (मुंबई) व अभिजीत काळे (सांगली) यांच्या गायनांच्या बैठका होणार असल्याची माहिती देवस्थान समितीने पत्रकार परिषदेत दिली.

कोविड महामारी मुळे गेली दोन वर्षे दिंडी महोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. मात्र, या वर्षी दिंडी महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.

मंगळवार दि. 1 रोजी श्री हरिमंदिरात श्रींची विधिवत षोडशोपचार महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम. सांयकाळी 7 वा, ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांचे किर्तन. बुधवार दि. 2 रोजी सायंकाळी 5 वा. विनय मुळे प्रस्तुत व श्री सोमनाथ भजनी मंडळ, केरये-खांडेपार यांच्या तर्फे ‘भजन संध्या’ हा भजनाचा कार्यक्रम. सायंकाळी 7 वा. ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांचे किर्तन. गुरूवार दि. 3 रोजी सायंकाळी 5 वा. स्वरांकूर प्रस्तुत भक्ती संगीताचा कार्यक्रम ‘चंद्रभागेच्या तीरी’ सांयकाळी 7 वा. ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांचे किर्तन. शुक्रवार दि. 4 रोजी सांयकाळी 5 वा. तुळशी परिवार, गोवा प्रस्तुत भजनाचा कार्यक्रम. सांयकाळी 7 वा. ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांचे किर्तन. शनिवार दि. 5 रोजी सायंकाळी 7.30 वा. ह. भ. प. विवेकबुवा जोशी यांचे किर्तन.

मुख्य दिंडी उत्सव रविवारी

रविवार दि. 6 रोजी मुख्य दिंडी उत्सवानिमित्त सकाळी 7 वा. श्रींस महाअभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम. सकाळी 10 वा. सुरेंद्र शेणवी बोरकर व साथी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम. दुपारी 12 वा. महाआरती व तद्नंतर महाप्रसाद (अन्नसंतर्पण). संध्याकाळी 5 वा. वारकरी संप्रदाय तर्फे भजनाचा कार्यक्रम. सांयकाळी 6.15 वा. श्री माऊलीची धार्मिक ग्रंथासह श्रींच्या रथात स्थापना. तद्नंतर 6.30 वा. श्री हरिमंदिरा समोरील व्यासपीठावर प्रमुख निमंत्रित गायक कलाकारांची ‘पहिली गायनी बैठक’ प्राजक्ता काकतकर व अभिजीत काळे यांची पहिली गायनी बैठक.

पहिल्या गायनी बैठकीनंतर रात्री 8 वा. सुप्रसिद्ध दिंडी आयोजक बाबू गडेकर संचलित श्री दामोदर बोगदेश्वर दिंडी पथक, वास्को आणि गोमंतका बाहेरील निमंत्रीत वारकरी भजनी मंडळासह श्री विठ्ठल रखुमाई रथाचे श्री हरिमंदिर येथून प्रस्थान. रात्री 9 वा. यूको बँक, न्यू मार्केट येथील व्यासपीठावर प्रमुख आमंत्रित गायक व वादक कलाकारांची दुसरी गायनी बैठक होईल. रात्री 11 वा. नगरपालिका चौकात प्रमुख गायक व वादक कलाकारांची तिसरी गायनी बैठक होईल. तद्नंतर श्रींच्या दिंडी रथाचे श्री राम मंदिर, श्री दामोदर साल व श्री विठ्ठल मंदिर, कोंब येथे प्रस्थान होईल.

सोमवार दि, 7 रोजी दुपारी 12.30 वा. श्रींच्या दिंडी रथाचे श्री हरिमंदिरात आगमन व नंतर ‘गोपाळकाला’ होईल व नंतर महाआरती. सायंकाळी 7.30 वा. देवाच्या भेटी आलेल्या वस्तुची ‘पावणी’ व रात्री 8 वा. सुप्रसिद्ध गायिका सौ. सूजाता गुरव (धारवाड) यांच्या गायनाची बैठक होईल. या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन गोविंद भगत हे करतील.

यंदाच्या गायन बैठकीला दयानिधेश कोसंबे, दत्तराज सुर्लकर, राहूल खांडोळकर, महेश धामस्कर व अभिजीत एकावडे हे वादक कलाकार साथ संगत करणार आहेत.

पत्रकार परिषदेला देवस्थानचे अध्यक्ष सुहास कामत, सचिव मनोहर बोरकर, खजिनदार रवींद्र नेवगी तसेच इतरांची उपस्थिती होती.

Related Stories

राष्ट्रीय सब-ज्युनियर, ज्युनियर टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचे संघ जाहीर

Amit Kulkarni

होंडा येथे पुन्हा अवजड वाहतूक रोखली

Amit Kulkarni

रामनाथ पंढरी गावडे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार

Amit Kulkarni

आपतर्फे पणजी आणि तालीगांवच्या 200 रिक्षा चालकांना मोफत रेशन किट वाटप

Amit Kulkarni

खांडोळा उच्च माध्यमिकसाठी सुसज्ज इमारत उभारणार

Patil_p

धारगळ दोन खांब रस्त्याचे सुशोभीकरण काम निकृष्ट

Amit Kulkarni