Tarun Bharat

सम्राट क्लब डोंगरीच्या अध्यक्षपदी दिनेश सांतिनेसकर

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

सम्राट क्लब ही एक आदर्श संस्था आहे, जी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मन जोडते. संस्थेच्या विकासासाठी अविश्रांत झटणे, प्रामाणिकता ही या संस्थेच्या सभासदांचा मौल्यवान ठेवा आहे.’असे उद्गार सम्राट क्लबाच्या अधिकार ग्रहण समारंभाच्या वेळी  प्रमुख पाहुणे श्री दिपक नार्वेकर यांनी काढले.

 यावेळी व्यासपीठावर दीपक नार्वेकर, शैलेश बोरकर, डॉक्टर उदय कुडाळकर, गौतम खरंगटे, हनुमंत मांजरेकर,, दिनेश सांतिनेसकर, मयूर धोंड, शिवदीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ. ममता काणकोणकर यांनी सरस्वती स्तवनाने केली.

 प्रवीण सबनीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नवीन सभासदांची ओळख श्री रामराव वाघ यांनी केली. तसेच डॉक्टर गौतम खरंगटे यांनी नवीन सभासदांना शपथ दिली.  दिनेश सांतिनेसकर यांनी अध्यक्ष ,शिवदीप नाईक सचिव, मयूर धोंड  खजिनदार, तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून दिगंबर काणकोणकर , विश्वास नासनोडकर ,डॉक्टर प्रकाश पर्येकर, रामराव वाघ ,नितीन नेवरेकर, फ्रान्सिस्को रापुसो, संजीवनी बांदोडकर , या मान्यवरांनी शपथ घेतली.

’आपण नि÷sने प्रामाणिकपणे संस्थेला उच्च पदी नेण्यासाठी प्रयत्न करीन’ असे संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश सांतिनेसकर यांनी म्हटले. प्रकाश पर्येकार लिखित ’पुरण’ या पुस्तकाच्या प्रति अध्यक्षांनी मान्यवरांना भेटी दाखल दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराव वाघ व आभार प्रदर्शन शिवदीप नाईक यांनी केले.

Related Stories

सासष्टीत 33 पंचायतीतून 863 उमेदवार

Amit Kulkarni

घाऊक मासळी मार्केटचा वाद शिंगेला आठ वाहनाची नासधुस

Patil_p

दिल्ली सीबीआय पथकाने नोंदविले बीडीओंचे जबाब

Amit Kulkarni

मडगावच्या बाजारपेठेत आंब्यांच्या सुगंधाची दरवळ

Patil_p

प्रतिभावान तरुणांर्पंत विज्ञान पोहोचले पाहिजे

Amit Kulkarni

सरकारच्या दुर्लक्षामुळे महसूल, रोजगार बुडाला

Patil_p
error: Content is protected !!